Manikravanchi Charitrakatha – माणिकरावांची चरित्रकथा
₹200.00
Product Highlights
हे लखलखतं माणिक…मराठीत प्रथमच सगळंच भव्य-दिव्य आणि चमत्कारिक! साता-यातल्या ताम्हणखो-यातली शिलेदार मंडळी गायकवाडांबरोबर बडोद्याला आली. त्यांनी तलवार गाजवली. म्हणून समस्त ताम्हाणे ‘माणिक’ ह्या किताबानं गौरविले गेले. त्यातला एक कुलदिपक : गजानन यशवंत माणिक. ह्या मल्लविद्याविशारदाला बडोदेकर संस्थानिकांनी सांभाळलं. माणिकनं संस्थानात ऐतिहासिक शस्त्रागार निर्माण केलं. गुरू जुम्मादादांच्या स्मरणार्थ ‘जुम्मादादा व्यायाम मंदिर’ स्थापन करून ते भरभराटीला आणलं. हकीम अब्दुल रहीमकडून युनानी वैद्यक आत्मसात केलं. अस्थिसंधान विद्या संपादन करून अनेकांना व्याधिमुक्त केलं. म.गांधींना शरीरमर्दनाची दीक्षा दिली. ‘प्रतापशस्त्रागार’ हा त्या क्षेत्रातला पहिला ग्रंथ रचला. ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ’ कार्यरत केलं. कुस्तीगीर तयार केले. मलखांबपथकं उभारली. गायकवाडीला ललामभूत झालेलं हे लखलखतं ‘माणिक’, म्हणजेच लो.टिळकांनी गौरविलेले ‘प्रोफेसर माणिकराव.’ त्यांचा हा शैलीसंपन्न परिचय मराठीत प्रथमच…
Reviews
There are no reviews yet.