MANASA – माणसं
₹170.00
Product Highlights
व. पु. काळे `माणूस`प्रेमी लेखक. त्यांनी गणितापेक्षा कवितेत अधिक जवळचे मानले त्यामुळे. विविध माणसेही त्यांच्या अधिक जवळ गेलीत ते अधिक. माणसांच्या जवळ गेले त्यामुळे माणसांचे एक चैतन्यदायी विलोभनीय कारंजेच त्यांना पहायला मिळाले. त्यातूनच त्यांच्या अनेक कथांचा लाभ झाला कथाकथनाचे कार्यक्रम रंगले. ह्या पुस्तकातील `माणसं` म्हणजे त्या त्या माणसांच्या पूर्ण कथा नसल्या तरी ही माणसे उलगडतीलच असे हे तुकडे आहेत. ह्यात वपुंनी ऐकलेल्या-वाचलेल्या पासून त्यांनी अनुभवलेल्या, मनीमानसी नोंदवलेल्या पर्यंतच्या अशा अनेक घटना आहेत की ज्याने वाचकाला वाचनानंदाबरोबरच आणखीही काही मिळाले. हे सारे बहिणाबाई अभिप्रेत “माणसा माणसा कधी व्हशीन माणूस” साठीच आहे.
Description
ICEBERG, IT IS SAID 9/10TH OF THE ICE IS BENEATH THE WATER, ONLY 1/10TH IS REVEALED ON THE SURFACE. I MAY BE WRONG AS MY MATHS IS NOT VERY STRONG; MATHS NEEDS INTELLIGENCE, WHICH IS WHAT I LACK IN. THAT MUCH PORTION OF MY BRAIN WAS VACANT, NATURALLY; SO THAT PLACE I OFFERED TO MY HEART AS AN EXTRA F.S.I. FOR ME, POETRY ALWAYS IS EXCLUSIVE AND IMPORTANT THAN MATHS, THAT IS WHY I COULD MEET MANY PEOPLE. ALL OF THESE PEOPLE WERE THE VARIOUS FORMS OF HAPPINESS AND VIBRANCY, SO I NEVER COUNTED THE STANZAS OF MY POETRY. AFTER ALL, COUNTING INVOLVES MATHS AND I PREFER TO BE MILES AWAY FROM IT. IF WE DO NOT MEASURE POETRY THEN WE COME ACROSS A “SHRIKANT`, MOVING IN THE WHIRLPOOL, TURNING IT UPSIDE DOWN. SHRIKANT CHANGED THE DIRECTION OF THE ICEBERG. HE TURNED IT UPSIDE DOWN. HE WRAPPED THE 9/10TH OF THE ICEBERG IN HAPPINESS WHICH WAS OTHERWISE FULL OF CALAMITIES AND MENTAL TENSIONS. HIS WIFE WRAPPED THE COLD ICE INTO THE WARMTH OF HER AFFECTION. WHAT ARE HIS WHEREABOUTS? SHRIKANT JOSHI, CHAWDAR TALE, MAHAD; I DEDICATE THIS BOOK `MAANASE` TO THE HUMAN IN HIM.
Brand
V.P.KALE
Birth Date : 25/03/1932
Death Date : 26/03/2001
लेखक, कथाकथनकार, आर्कीटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या. मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला पॅटर्न म्हणायचे. वपुंनी पॅटन्र्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटन्र्सना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक रंग मनाचे दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१… आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा हुंकार अजूनही वन फॉर द रोड करता दिला-घेतला जातोय. हा दोस्त असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार..
Reviews
There are no reviews yet.