MAHASHWETA – महाश्वेता
₹190.00
Product Highlights
ती अनुपम लावण्यवती,गरीब शाळामास्तरांची मुलगी. तो एक देखणा डॉक्टर – घरंदाज,लक्ष्मीपुत्र. सर्वांच्या मर्जीविरुद्ध त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु दुर्दैवानं काही महिन्यांतच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि साया घरादारानं त्या अभद्राला घाबरून, किळसून तिला माहेरी हाकलून लावलं — कचराकुंडीत घाण फेकावी, तसं !…. …. पुढे तिनंही आपलं स्वतंत्र अवकाश उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या आत तडफडू लागला – ‘तिच्याऐवजी आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का?….’ काय असते या वास्तवातली तडफड?… काय असू शकतो अशा गोष्टींचा शेवट?…. कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपरिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाया संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन, स्वत:च्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केलं आहे. लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी,यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे. अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या या कादंबरीचा हा उत्कृष्ट मराठी अनुवाद वाचकांना चटका लावेल व विचारास प्रवृत्त करेल.
Description
SHE WAS A VERY BEAUTIFUL LADY, BUT WAS BORN TO A POOR SCHOOL MASTER. HE WAS A VERY HANDSOME DOCTOR, FROM A VERY RICH AND NOBLE FAMILY. HE MARRIED HER AGAINST EVERYONE`S WISH. BUT WITHIN A FEW MONTHS AFTER MARRIAGE SHE GOT WHITE SPOTS ON HER BODY, LEUKODERMA. EVERYONE GOT SCARED OF HER UGLINESS AND THEY THREW HER OUT OF THE HOUSE, THEY SENT HER BACK TO HER PARENT`S HOUSE, AS IF SHE WAS A PIECE OF GARBAGE. SHE BUILT UP HER OWN UNIVERSE, BUT HE WAS CURSING HIMSELF. WHAT IF HE HAD SUFFERED WITH THE SAME DISEASE? WOULD SHE HAVE DISCARDED HIM LIKE A PIECE OF GARBAGE? WHAT CAN BE THE END OF SUCH STORIES? SUDHA MURTHY HAS GIVEN AN INSIGHT TO A SIMPLE WOMAN FROM A TRADITIONAL FAMILY. THE WOMAN IS SHATTERED WITH THE DISEASE BUT YET SHE COMES OUT OF IT. SHE SHAPES HER LIFE WELL. THE NOVEL HAS FOUND SOME DEPTH BECAUSE OF THE AUTHOR`S MATURED THOUGHTS AND HER ATTEMPTS TO CORRELATE WITH THE MODERN LIFE. THIS NOVEL HAS BEEN TRANSLATED IN MANY OF THE INDIAN LANGUAGES. WE ARE SURE THAT THIS MARATHI TRANSLATION WILL BE ABLE TO TOUCH THE HEARTS AND MAKE THEM THINK OVER.
Brand
SUDHA MURTY
Birth Date : 19/08/1950
सुधा मूर्ती यांचा जन्म १९५० साली कर्नाटक राज्यातल्या शिग्गावि येथे झाला. त्यांनी कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम.टेक. ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथे टेल्को कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंता होत्या. त्या विख्यात सामाजिक कार्यकत्र्या आणि कुशल लेखिका आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. या फाउंडेशनतर्फे करण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्यासाठी त्या विख्यात आहेत. कर्नाटकातल्या सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या चळवळीच्या त्या प्रणेत्या आहेत. १९ नोव्हेंबर, २००४ मध्ये त्यांना समाजकार्याच्या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल राजलक्ष्मी पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधा मूर्ती यांना सामाजिक कार्य आणि साहित्यसेवेसाठी सहा डॉक्टरेट्स मिळाल्या आहेत. यापैकी दोन डॉक्टरेट्स महाराष्ट्रातील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातर्फे देण्यात आल्या. कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठाकडून साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी एक आणि कर्नाटक विद्यापीठाकडून एक अशा दोन डॉक्टरेट्स त्यांना बहाल करण्यात आल्या. तमिळनाडूतील सत्यभामा विद्यापीठाने आणि आंध्रप्रदेशातील श्री पद्मावती विश्वविद्यालयानेही त्यांना डॉक्टरेट्स देऊन सन्मानित केले. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना 2020 सालीच्या 21व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
Reviews
There are no reviews yet.