LOKNAYAK – लोकनायक
₹120.00
Product Highlights
‘‘पापाजी, आर्किटेक्ट घराचा नकाशा देतो. कॉन्ट्रॅक्टर घर बांधून देतो. पण राहतो कोण? घर पुरं झालं की, समोर पडलेली वाळू, चुना, सिमेंट, विटांचे तुकडे यांचे ढीग फेकून द्यावे लागतात. त्या घरात कॉन्ट्रॅक्टर राहत नसतो. ज्याच्याठायी घराचं घरपण टिकवण्याची हौस असते, तोच राहतो. स्वातंत्र्याच्या एका स्वप्नानं आयुष्यभर धावणारे तुम्ही, स्वातंत्र्यानंतर नवीन देश फुलवण्याची कुवत तुमच्यांत नव्हती, हे कधीच तुमच्या ध्यानात आलं नाही. स्वप्नं जरूर होती. ते साकार करण्याची दृष्टी वा बळ नव्हतं… ‘‘…आजवर जोपासलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतला कुणी? एवढ्या वर्षांत फक्त लुटारू, ढोंगी आणि स्वार्थी माणसांनीच स्वातंत्र्याची मजा लुटली….’’ स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणाची परखड समीक्षा करणारं नाटक.
Description
PAPAJI, AN ARCHITECT DRAWS THE PLANS OF A HOUSE, AND THE CONTRACTOR CONSTRUCTS IT. BUT WHO STAYS IN IT? WHEN THE CONSTRUCTION IS COMPLETED, THE RUBBLE, LEFT-OVER CEMENT, BRICKS, AND MORTAR ARE DISCARDED. THE CONTRACTOR DOES NOT DWELL THERE. ONLY THE ONE WHO HAS THE DESIRE TO MAINTAIN THE ‘HOMELINESS’ OF THE PLACE DOES. ALL YOUR LIFE YOU PURSUED THE DREAM OF INDEPENDENCE, BUT YOU NEVER REALISED THAT YOU DID NOT POSSESS THE CAPACITY TO NURTURE THE NEWLY-INDEPENDENT COUNTRY. THE DREAM WAS DEFINITELY THERE. BUT YOU HAD NEITHER THE VISION, NOR THE STRENGTH TO GIVE SHAPE TO THIS DREAM… “…WHO IS ENJOYING THE FRUITS OF THIS INDEPENDENCE OVER THE YEARS? ONLY THE LOOTERS, THE SELFISH, AND THE CHARLATANS…” THIS PLAY IS A CANDID CRITIQUE OF THE POLITICS OF POST-INDEPENDENCE INDIA.
Brand
RANJEET DESAI
Birth Date : 08/04/1928
Death Date : 06/03/1992
उमद्या, दिलदार मनाचा एक थोर साहित्यिक. रणजित देसार्इंचे साहित्य म्हणजे वाचकांशी उच्च भावनिक स्तरावर साधलेला कलात्मक संवाद. महाराष्ट्रातील या थोर, सर्जनशील, प्रतिभावान साहित्यिकाचा जन्म कोल्हापुरातील कोवाड येथील एका संपन्न खानदानी कुटुंबात झाला. शिक्षणानंतर कोवाडला स्थायिक झाल्यावर तिथल्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी लेखन-वाचन हा छंद जोपासला. १९४६ मध्ये प्रसाद या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या भैरव या पहिल्याच कथेला पारितोषिक मिळाले. १९५८ साली त्यांचा रूपमहाल हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याच सुमारास बारी ही कादंबरी लिहून त्यांनी कादंबरीक्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक या विषयांबरोबरच चरितकहाणी हा कादंबरीचा नवा प्रकार हाताळला आणि आपल्या समर्थ लेखणीने तो लोकप्रियही केला. चरित्रकादंबरीसाठी त्यांनी निवडलेल्या व्यक्ती सर्वसामान्य वर्गात न बसणाऱ्या, असामान्य कर्तृत्व असलेल्या आहेत. स्वामी या त्यांच्या कादंबरीला अफाट लोकप्रियता मिळाली. या कादंबरीत त्यांनी थोरले माधवराव पेशवे व त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्यातील कोमल भावबंध लोकांसमोर मांडला. या कादंबरीवर लोकांनी जिवापाड प्रेम केलेच, त्याचबरोबर रणजित देसाई यांना स्वामीकार हा किताबही बहाल केला. कथालेखन करताना देसाई यांनी प्रथमच जाणीवपूर्वक प्राणिकथा लिहिल्या. या कथांमधून निसर्ग, माणूस आणि प्राणी यांचा अतूट संबंध त्यांनी फारच प्रभावीपणे मांडला. स्वामी या एकाच कादंबरीला राज्य पुरस्कार, ह.ना. आपटे पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले. रणजित देसाई यांनी अनेक प्रादेशिक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. साहित्यक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री हा किताब बहाल करून सन्मानित केले.

Reviews
There are no reviews yet.