Lokmanya Te Mahtama (Part 1 & 2) – लोकमान्य ते महात्मा (भाग १ व २)
₹1,500.00
Product Highlights
मान्यवरांचे काही अभिप्रायया ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचाआणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतलाआहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनीएकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे.– य. दि. फडकेराजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-याया ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीयपध्दतीच्या मांडणीत!– दिलीप पुरुषोत्तम चित्रेभारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्तकालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा ‘पॅरेडाइम’देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारीवाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो.– कुमार केतकरमानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीणदर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करूनसोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातीलनिर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षणकामगिरी पार पाडली आहे.– प्रा. जे. व्ही. नाईक‘लोकमान्य ते महात्मा’ हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकषसांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकटलाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमानवाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे.– रा. ग. जाधवमहाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाणमीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्याआंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतलाआहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदारठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली,असा निष्कर्ष काढला आहे.– सदा डुम्बरे
Brand
डॉ. सदानंद मोरे

Reviews
There are no reviews yet.