Life & Death in Shanghai – लाइफ ऍण्ड डेथ इन शांघाय
₹250.00
Product Highlights
`युगानुयुगे निद्रिस्त राहिलेल्या चिनी माणसाला सतत जागंठेवण्यासाठी वारंवार क्रांतीचं धक्कातंत्र अनुसरावं लागतं…’माओच्या या वचनाचा आधार घेऊन त्याच्या चिआंग चिंग या
पत्नीनं आपल्या सहका-यांकरवी 1966 च्या सुमारास चीनमध्ये`सांस्कृतिक क्रांती’ नावाची प्रचंड उलथापालथ घडवून आणली.त्या क्रांतीच्या वावटळीत हजारो निरपराध चिनी नागरिकांचे जीवनपार उद्ध्वस्त झालं. अशाच एका अभागी, पण जिद्दीनंपरिस्थितीला सामो-या जाणा-या स्त्रीचं हे थरारक आत्मकथनम्हणजे काही वर्षांपूर्वीच्या चिनी समाजाचं एक विदारक चित्र आहे.हे आत्मकथन कोणत्याही सहृदय माणसाला मनाला घायाळकरील, इतकं प्रत्ययकारी आहे. तुरुंगाच्या खिडकीतून बाहेरच्याजगाचा वेध घेऊ पाहणा-या निएन चंग नावाच्या एका मातेची हकथा आहे. ती जशी तिच्या हालअपेष्टांची कथा आहे, तशीच तीतिच्या हरपलेल्या मुलीचीही शोधकथा आहे. तिचं सर्वस्व हिरावूनघेण्यासाठी टपून बसलेले विध्वंसक रेडगार्ड्स, त्यांना प्रोत्साहनदेणारे मतलबी नेते आणि त्या नेत्यांच्या दडपशाहीला बळी पडूनसग्यासोय-यांच्याच जिवावर उठणारे दीनवाणे सामान्यजन यासा-यांचे अत्यंत प्रभावी चित्र या पुस्तकात रेखाटलेले आढळते.सर्वसामान्य चिनी माणसाच्या व्यथावेदनांचा परिचय करून देणारे…ऊरबडवा आक्रोश न करतासुद्धा मरणप्राय यातनांना शब्दरूप
देणारं… आणि लेखिकेच्या अनुभवांचा अस्सल प्रत्यय देणारंआगळं आत्मकथन म्हणून निएन चंगचं हे पुस्तक जगभर गाजलंआहे, ते या प्रभावी गुणवैशिष्ट्यांमुळेच!
Reviews
There are no reviews yet.