Laxmanresha – लक्ष्मणरेषा (आत्मचरित्र)
₹202.50
Product Highlights
व्यंगचित्रात भारतीय माणसं दाखवायची म्हणजे आर. के. लक्ष्मण यांना मोठाजमावच काढावा लागे. गुजराती, मराठी, केरळी, बंगाली, मद्रासी, पंजाबीअशी वेगवेगळया चेहरेपट्टयांची, पोशाखांची माणसं काढायला वेळ लागे.व्यंगचित्र सादर करण्याची वेळ गाठण्यासाठी हळूहळू या जमावातील एकेकमंडळींना लक्ष्मण चाट देऊ लागले. अखेर एकच जण उरला. टक्कलअसलेला, फुगीर नाकाचा, आखूड मिश्यांचा, धोतर व चौकडीचा कोटघातलेला आणि सदोदित चेह-यावर भांबावून गेल्याचे भाव असलेला ‘सामान्यमाणूस’ (कॉमन मॅन). या देशातील कोटयावधी मूक जनतेचं प्रतिनिधित्व तोकरू लागला. लक्ष्मण यांच्या या आत्मकथेत त्यांचीही अवस्था कधी कधी या‘सामान्य माणसा’सारखी होते. कधी त्यांच्या व्यंगचित्रात आकडे लपले आहेत,असं समजून सट्टा खेळणारा व्यापारी त्यांना येऊन भेटतो, कधी न्यूयॉर्कमधीलपार्क अॅव्हेन्यू भागात ते रेनकोट घेऊन गेल्यानं त्यांना चुकून मेक्सिकन समजलंजातं, तर एकदा मद्य पार्टीनंतर एवढी गाढ झोप त्यांना लागते की, आयुष्यातलाएक दिवस ‘कोरा दिवस’ ठरतो! जीवनाच्या कॅनव्हासवर लक्ष्मण यांनीरेखाटलेली शब्दचित्रं, टिपलेल्या घटना त्यांच्या व्यंगचित्रांइतक्याच मिश्कील,खटयाळ, खुसखुशीत आणि खुमासदार आहेत. उपहास, विडंबनाचा सूरपकडत जाणारी आणि सदोदित तजेल्याचं वरदान लाभलेली ही ‘लक्ष्मणरेषा’.
Brand
अशोक जैन

Reviews
There are no reviews yet.