Kimayagar (Scicom) – किमयागार (सायकॉम)
₹350.00
Product Highlights
सुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावरअभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणीमाझ्याकडून घडलेली चूक होती.
पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनीआद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेषयांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेलीअशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळ्या विषयांतलेकिमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतनं
सहजपणे एकहाती लिहिलं आहे.एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठीविज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी
त्याचं अभिनंदन करतो.पद्मविभूषण वसंत गोवारीकरविश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारेविज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा आहे.
ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितचअसतात. उदाहरणार्थ, मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चितकरणा-या ‘मॅक्स्वेल’ची ओळख किती जणांना असेल?विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्याझगड्याचा आणि त्या घडवणा-या ‘किमयागारां’चा रोमहर्षक इतिहास सांगणारे
हे आगळेवेगळे पुस्तक.पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधूनकाढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक
साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखनजिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते.अतीश दाभोलकर
(भटनागर पुरस्कारविजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक)
Reviews
There are no reviews yet.