KHELANICH KHELANI – खेळणीच खेळणी
₹90.00
Product Highlights
`खेळ खेळणे` हा लहान मुलांचा स्थायीभाव आहे. अगदी रांगायला लागल्यापासून मुलांना खेळण्यांचे आकर्षण असते. आणि ही खेळणी त्यांना स्वत:लाच करायला सांगितली तर? त्यांना किती आनंद होईल याची कल्पना करू शकाल? `मी हे करू शकतो; मी हे केले` या अभिजात कृतीला योग्य वाव देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. हा प्रयत्न किती सफल झाला, हे वाचकांनीच ठरवायचे आहे.
Brand
D.S.ITOKAR
Birth Date : 23/09/1945
डी.एस. इटोकर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या गावी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. चित्रकला, कार्यानुभव, कळसूत्री बाहुली नाट्य, पटकथा लेखन, कृती संशोधन अशा वेगवेगळ्या विषयांत त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या लोकसंख्या शिक्षण उपकरण आणि वैज्ञानिक उपकरण यांना जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रभावी चित्रकला अध्यापन, विज्ञान उपकरणांची निर्मिती, शैक्षणिक साधनांचे अध्यापनात महत्त्व अशा विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले आहे. जीवन-शिक्षण , शिक्षण संक्रमण , विज्ञान युग , प्रगत विज्ञान अशा विविध मासिकांमधून इटोकर यांनी लोकसंख्या शिक्षण, समाजोपयोगी उत्पादक कार्य, विज्ञान, चित्रकला, कार्यानुभव या विषयांवर भरपूर लिखाण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराबरोबरच इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आपल्या आसपास सहज मिळणाऱ्या वस्तू वापरून खेळणी तयार करता करता लहान मुलांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांच्यातील सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल, अशी त्यांना खात्री आहे. हा दृष्टिकोन बाळगूनच त्यांनी वैज्ञानिक खेळणी, छंदातून विज्ञान, खेळणीच खेळणी ह्या पुस्तकांची निर्मिती केली.
Reviews
There are no reviews yet.