KHELANI VIDNYANACHI – खेळणी विज्ञानाची
₹120.00
Product Highlights
अगदी हसत खेळत व ताण-तणाव बाजूला ठेवून मुलांना विज्ञानाचे शिक्षण देता देता विज्ञानातले सिद्धांतही माहित करून देण्याच्या उद्देशाने श्री. डी.एस.इटोकर यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. विज्ञानविषयक सुमारे पन्नास खेळणी स्वतः तयार करून त्यांच्याबरोबर खेळणे व मित्रांना दाखविणे यात मुलांना आनंद तर मिळेलच, पण त्याचबरोबर त्यांच्या विज्ञानविषयक ज्ञानात भर पडून विज्ञानाची अभिरुचीही वृद्धिंगत होईल.
Description
MR. ITOKAR HAS DEVELOPED AND DESIGNED THIS BOOK ESPECIALLY TO TRAIN THE YOUNG MINDS IN THE FIELD OF SCIENCE AND TO MAKE THEM AWARE OF THE VARIOUS THEORIES OF SCIENCE IN A STRESS FREE ENVIRONMENT. IT IS REALLY GOING TO BE A WONDERFUL EXPERIMENT FOR THE KIDS TO DESIGN ALMOST 50 SCIENTIFIC TOYS ALL BY THEMSELVES AND TO ENJOY PLAYING WITH THEM. THIS WILL NOT ONLY ENTERTAIN THEM BUT ALSO INTRODUCE THEM TO THE VARIOUS ASPECTS OF SCIENCE. A FEW TO NAME ARE: JELLY FISH IN THE WATER, THE BOAT RUNNING ON THE WATER SURFACE, THE FLOATING FISH, SAFE SIPHON, THE GROWING BUBBLES, THE DOLL IN WATER, PARROT IN THE CAGE, PLANTS TURN TOWARDS SUNLIGHT, JUMPING SPRING, THE FUNNY JOKER, HELICOPTER, HOT AIR IS LIGHT, TORCH RUNNING ON KEROSENE, ELECTRICAL IMAGES, JUMPING BALLOON, THE HONEYBEE, THE ROUND FOUNTAIN OF WATER, THE PHASES OF MOON, AND SO ON.
Brand
D.S.ITOKAR
Birth Date : 23/09/1945
डी.एस. इटोकर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या गावी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. चित्रकला, कार्यानुभव, कळसूत्री बाहुली नाट्य, पटकथा लेखन, कृती संशोधन अशा वेगवेगळ्या विषयांत त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या लोकसंख्या शिक्षण उपकरण आणि वैज्ञानिक उपकरण यांना जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रभावी चित्रकला अध्यापन, विज्ञान उपकरणांची निर्मिती, शैक्षणिक साधनांचे अध्यापनात महत्त्व अशा विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले आहे. जीवन-शिक्षण , शिक्षण संक्रमण , विज्ञान युग , प्रगत विज्ञान अशा विविध मासिकांमधून इटोकर यांनी लोकसंख्या शिक्षण, समाजोपयोगी उत्पादक कार्य, विज्ञान, चित्रकला, कार्यानुभव या विषयांवर भरपूर लिखाण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराबरोबरच इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आपल्या आसपास सहज मिळणाऱ्या वस्तू वापरून खेळणी तयार करता करता लहान मुलांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांच्यातील सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल, अशी त्यांना खात्री आहे. हा दृष्टिकोन बाळगूनच त्यांनी वैज्ञानिक खेळणी, छंदातून विज्ञान, खेळणीच खेळणी ह्या पुस्तकांची निर्मिती केली.
Reviews
There are no reviews yet.