KAVITA DOGHANCHI – कविता दोघांची
₹90.00
Product Highlights
‘फुलांचा सुगंध हा फक्त फुलांसाठीच नसतो, तर फुलांपेक्षासुद्धा जास्त तो इतरांसाठी असतो!’ कवितेचेही असेच असते. ती कवीला स्फुरेपर्यंत कवीची असू शकते; पण त्यानंतर कवितेची अनुभूती इतरांनाही मिळावी, यासाठी कवी ती सादर करतो, तीही केवळ रसिकांसाठीच! थोडक्यात, कविता ही कवीइतकीच किंबहुना ती कवीपेक्षाही जास्त रसिकाची असते. ती दोघांची असते, म्हणून ‘कविता दोघांची…’ या कवितांमध्ये उत्तुंग कल्पनेच्या भरा-या किंवा जीवनातील कूट प्रश्नांची उकल वगैरे काही नाही. सामान्य माणसाला जीवन जगत असताना जो अनुभव प्रकर्षाने येतो, तो साध्या शब्दांत ग्रथित केला आहे. कविता वाचताना रसिकाला वाटेल की, ‘अरेच्चा! मलाही असंच वाटत होतं, मलाही असंच म्हणायचं होतं.’ हेच या कवितांचे गुणविशेष आहे, म्हणून ही ‘दोघांची कविता!’
Brand
SURESH VASANT NAIK
Birth Date : 01/04/1900
शिक्षण : बी. एस्सी., एलएल. बी. क्रांतिवीर भगतिंसग व राजगुरू यांचे सहकारी व पुण्यातील नामंवत वकील कै. वसंतराव नाईक यांचे पुत्र. वकिली व्यवसायास प्रारंभ करून नंतर सरकारी वकील म्हणून काम केले. महाराष्ट्रामध्ये न्यायाधीश म्हणून निरनिराळ्या ठिकाणी नियुक्ती. कोल्हापूर, अकोला, सांगली, अलिबाग येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबईमध्ये महाराष्ट्र औद्योगिक न्यायाधिकरण येथे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. निवृत्तीनंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत. आय.एल.एस., सिम्बॉयसिस लॉ कॉलेज व इतर कॉलेजमध्ये कायदा या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत. इतर कार्य : विश्वकोशाचे अभ्यागत संपादक म्हणून निरीक्षण व स्फुटलेखन. मासिक व वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर लेखन, प्रवासवर्णनपर लेखन प्रसिद्ध, कृषिवल, केसरी, श्री समर्थ मासिक, साईबोध मासिक इ. ठिकाणी लेखन. तसेच रामदासस्वामी न्यायसंस्थेमध्ये काम केले.
Reviews
There are no reviews yet.