KARYAMAGNA VYASTA LOKANSATHI YOGSADHANA – कार्यमग्न व्यस्त लोकांसाठी योगसाधना
₹90.00
Product Highlights
‘कार्यमग्न, व्यस्त लोकांसाठी योगसाधना’ हे पुस्तक म्हणजे निरोगी प्रकृतीसाठी योग्य मार्गदर्शक होय. विशेषत: ज्या लोकांचे कार्यबाहुल्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरते. निरोगी प्रकृतीचे रहस्य काय? निद्रा, व्यायाम, विश्रांती ह्यांचे योग्य प्रमाण, पोषक आहार, शरीरांतर्गत स्वच्छता, हानिकारक व्यसनांपासून दूर राहणे, मन तणावमुक्त राखणे ह्या सर्वांची फलनिष्पत्ती म्हणजे निरोगी प्रकृती. हे निरामय जीवन साध्य करण्यासाठी योगासने, प्राणायाम, षट्कर्म (शुद्धितंत्र), योगनिद्रा आणि ध्यानधारणा ह्यांचा अवलंब करणे अटळ आहे. ही योगसाधना कोणालाही आचरणात आणता येईल अशी साधी, सहज असून रोजच्या दिनक्रमातही तुम्हांला ती पार पाडता येईल.
Description
THIS BOOK IS AN EXCELLENT GUIDE FOR A HEALTHY BODY. MANY PEOPLE ARE SO BUSY THESE DAYS THAT THEY HARDLY FIND ANY TIME FOR THEMSELVES. THIS BOOK WILL SHOW THE SIMPLEST WAYS TO KEEP FIT AND THAT TOO IN A SHORT PERIOD OF TIME. WHAT IS THE SECRET OF GOOD HEALTH? A PERFECT COMBINATION OF SLEEP, EXERCISE AND REST; HEALTHY DIET, HYGIENE, KEEPING AWAY FROM ADDICTIONS, AND HAVING A STRESS FREE MIND ARE THE SIMPLE THINGS WHICH HELP US TO HAVE A GOOD HEALTH. OUR LIFE IS A GIFT WHICH WE GET JUST ONCE. SO LET US MAKE IT A PERFECT GIFT AND TRY AND KEEP IT IN GOOD SHAPE. THE SIMPLE THINGS TO ACHIEVE THIS ARE PRACTICING YOGA REGULARLY, PRANAYAM, SHATKARMA OR SHUDDHITANTRA, YOGNIDRA AND MEDITATION. ANYONE CAN PRACTICE YOGA; THE SIMPLE WAY IS DESCRIBED IN THIS BOOK FOR YOUR CONVENIENCE. JUST PRACTICE IT DAILY.
Brand
BIJOYLAXMI HOTA
बिजयालक्ष्मी होता योगोपचार क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व. त्यांनी योगाचे शिक्षण मुंगेर येथील प्रसिद्ध बिहार स्कूल ऑफ योगा येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडून प्राप्त केले़ बिजयालक्ष्मी यांनी योग, तंत्र, मंत्र, आयुर्वेद, निसर्गोपचार अशा अनेक विषयांवर सखोल अभ्यास केला. या सर्व विषयांबरोबरच मानवी शरीरयंत्रणेचा अभ्यास करून त्यांनी संपूर्ण योग उपचारपद्धती (INTEGRATED YOGA) विकसित केली. माणसागणिक बदलणारे आजार, स्वभाव, त्याच्या गरजा आणि मर्यादा यांना अनुसरून त्यांचा दिनक्रम ठरविण्यावर बिजयालक्ष्मींचा विश्वास आहे. त्यांना मिळालेले यश हे त्यांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे.
Reviews
There are no reviews yet.