KARNAPISHACHCHA – कर्णपिशाच्च
₹250.00
Product Highlights
पोलीस आणि वैज्ञानिक यांनी एकमेकांच्या सहकार्यातून लावलेला गुन्ह्यांचा शोध ही मध्यवर्ती कल्पना मनात ठेवून लिहिलेली मालिका म्हणजेच हा कथासंग्रह. प्रत्येक कथा वेगळी, तिचं सूत्र वेगळं; तरीही या सर्व कथांना जोडणारा समान दुवा म्हणजे अमृतराव आणि कौशिक. ‘वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे उलगडत जाणारी कोडी’ हे या कथांचे खास वैशिष्ट्य! कथेत घडणारे गुन्हे, खून, त्यामुळे निर्माण होणारे गूढ, रहस्यमय वातावरण यातून पुढे काय होणार? ही उत्कंठा तगवून ठेवण्यात सर्वच कथा यशस्वी ठरतात. गंभीर विषय असूनदेखील कौशिक आणि अमृतरावांची मिष्कील जुगलबंदी चांगलीच रंगते. डॉ. बाळ फोंडके यांचे हे मानसपुत्र केवळ पोलीस न ठरता दोन संवेदनाशील व्यक्तिमत्त्वे म्हणूनही वाचकाला जवळची वाटू लागतात, हे या कथासंग्रहाचे खरे यश!
Description
THIS IS A SERIES OF STORIES BASED ON THE IDEA THAT THE POLICE FORCE AND THE SCIENTIST WORK TOGETHER TO INVESTIGATE THE CRIMES. EACH STORY IS DIFFERENT, EACH HAS A DIFFERENT SET UP, YET ALL THE STORIES ARE RELATED TO AMRITRAO AND KAUSHIK. THE SALIENT FEATURE OF THESE STORIES IS THE SOLUTIONS FOR ALL THE PUZZLES WITH THE HELP OF SCIENCE AND TECHNOLOGY. ALL THE STORIES SUCCEED IN CREATING A SUSPENSE, THE CRIMES RESULTING INTO SOME TENSION, DOUBT, THE SCEPTICAL ENVIRONMENT THAT COMES ALONG WITH IT, EACH MAKING US THINK “WHAT NEXT?` EVEN THOUGH SERIOUS BY NATURE THESE STORIES HAVE A WONDERFUL BLEND OF HUMOUR WHEN AMRITRAO AND KAUSHIK ARE AROUND. THESE TWO THOUGH ARE DR. BAL PHONDKE`S CREATION AND ARE BASICALLY POLICE, THEY ARE SHOWN TO BE VERY SENSITIVE IN NATURE, NO WONDER THE READERS FIND THEM CLOSE TOO.
Brand
DR.BAL PHONDKE
Birth Date : 22/04/1939
डॉ. गजानन पुरुषोत्तम ऊर्फ बाळ फोंडके एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, विज्ञानविषयक सदरे, लेख, कथा, पुस्तके आणि शोधनिबंधांचे लेखक आहेत. १९६० साली आण्विक भौतिकी विषयात मुंबई विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर २३ वर्षे मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रातील जीव-वैद्यकीय विभागात व्यावसायिक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र ही त्यांची संशोधनाची क्षेत्रे होती. १९६७ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी विषयाची डॉक्टरेट मिळाली. १९६५-६७ व पुन्हा १९७४ मध्ये लंडनमधील चेस्टर बिट्टी इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च येथे अभ्यागत शास्त्रज्ञ म्हणून काम केले. १९७६-७७ मध्ये अमेरिकेतील कॅन्सस विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील पॅथॉलॉजी विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. विविध विषयांचे व्यासंगी लेखक म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वत:चे वेगळे ठळक स्थान निर्माण केले आहे. त्यांनी लिहिलेले लेख नियतकालिके, मासिके आणि वर्तमानपत्रांमधून नेहमी प्रसिद्ध होत असतात. उद्याचे वैद्यक, चिरंजीव आणि कॉम्प्युटरच्या करामती या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुक्रमे १९८९, १९९० आणि १९९२ सालचे पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञान विषय लोकप्रिय करण्यासाठीचे इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीचे इंदिरा गांधी पारितोषिकही १९९२ साली त्यांना मिळाले. इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन्सचे संचालक आणि प्रमुख संपादक म्हणून १९८९ पासून ते कार्यरत होते. सायन्स रिपोर्टर या मासिकाचे संपूर्ण स्वरूप बदलून ते अधिक आकर्षक, वाचनीय करण्यात डॉ. फोंडके यांच्या संपादन कौशल्याचा मोठा वाटा आहे. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे सध्याचे आकर्षक स्वरूप ही त्यांचीच कामगिरी आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या १९९८ च्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
Reviews
There are no reviews yet.