KALPIT -AKALPIT – कल्पित -अकल्पित
₹200.00
Product Highlights
विस्मय, अद्भुतता, अनाकलनीय गूढ या गोष्टींचे मानवी मनाला नेहमीच आकर्षण असते. विज्ञान यातील ब-याच गोष्टींवर सत्याचा प्रकाश टाकते. पण जसजसे विज्ञान पुढे जाते, तसतसे ते स्वत:बरोबरही काही प्रश्नही निर्माण करते. शास्त्रज्ञ त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतत जातात. आणि आपण सगळेच विज्ञान आणि विज्ञानाने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या भोव-यात रमून जातो. आणि पुन्हा पुन्हा अनुत्तरित प्रश्नांच्या आणि कल्पनांच्या वलयात गुंगून जातो. ह्या कथा अशाच सहज सुचलेल्या वैज्ञानिक कल्पनांमधून साकारल्या आहेत. ह्या कथांमधील कल्पना खNया का खोट्या यांचे मोजमाप न करता, केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात. त्यामधून वैज्ञानिक सिद्धांत इ. शोधण्याच्या भानगडीत पडू नये. कारण ह्या सर्व कथांमधील पात्रे, प्रसंग, विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. कथा काय किंवा कविता काय शेवटी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून असे म्हणतात ना… ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ त्यामुळे कुणी सांगावे, की आज ज्या निव्वळ कल्पना वाटत आहेत त्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे, भविष्यकाळी प्रत्यक्षातही येतील कदाचित.
Description
A HUMAN MIND IS ALWAYS ATTRACTED TOWARDS THE ASTONISHING SUPER NATURAL POWERS, AND IMPENETRABLE MYSTERIES. IT IS TRUE THAT SCIENCE SHADES LIGHT ON MANY OF THESE SO CALLED MYSTERIES, BUT AT THE SAME TIME WE SHOULD NOT IGNORE THAT THE FACT MODERN SCIENCE IS CREATING MORE AND MORE QUESTIONS. THE SCIENTISTS THEN HAVE TO WORK ON THESE QUESTIONS TOO. THE LAY MEN REMAIN ENTANGLED IN THE WHIRLPOOL OF SCIENCE AND TECHNOLOGY, TIRING THEMELVES IN THE ATTEMPT TO FIND OUT THE ANSWERS TO THESE PROBLEMS. THE STORIES HEREIN HAVE A SCIENTIFIC BASE. THEY ARE WRITTEN WITH THE HOLE AND SOLE PURPOSE OF ENTERTAINMENT, THE AUTHOR DOES NOT CLAIM TO HAVE ANY SCIENTIFIC BASE TO THEM. SO TRYING TO FIND OUT SOME SCIENTIFIC ASPECT TO THEM WILL BE A VAIN ATTEMPT. ALL THE CHARACTERS, INCIDENTS, THOUGHTS ARE FICTITIOUS. ANY RESEMBLANCE TO ANYBODY OR ANYTHING WILL BE A MERE COINCIDENCE. STORIES AS WELL AS POEMS ARE THE TWO SIDES OF A COIN, AND THE MIND POWER OF A POET OR AN AUTHOR CANNOT BE NEGLECTED. HE SEES BEYOND EVERYTHING USING HIS MOST IMAGINATIVE VISION; AND YOU NEVER KNOW, TOMORROW WE MAY COME ACROSS THE INCIDENTS MENTION HERE IN REALITY, DEPENDING UPON THE PROGRESS OF SCIENCE AND TECHNOLOGY.
Brand
SUDHA RISBUD
Birth Date : 25/06/1960
सुधा रिसबुड यांनी डीईई, एएमआयई (इलेक्ट्रॉनिक), एमआयई, पी.जी. डिप्लोमा (न्यायदर्शन) तसेच एमए (प्राचीन भारतीय इतिहास) ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. रिसबुड यांनी संरक्षण विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून क्वॉलिटी अशुअरन्स इंजिनिअरिंगचे काम केले व स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी वैज्ञानिक कथा आणि वैज्ञानिक विषयावर २९ वर्षे सातत्याने मराठीतून लेखन केले आहे. आतापर्यंत त्यांची अंतरिक्षाचा वेध (पुणे मराठी ग्रंथालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार ,२००६), कल्पित-अकल्पित (महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार , २००९), भास्कराचार्य ते गॉस गणिताचा ध्यास (२०११), भारतीय स्त्री : एक मीमांसा (पुणे मराठी ग्रंथालयाचा चेतना पुरस्कार , २०१३) आणि रिचर्ड फाइनमन : एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व (२०१३) अशी पाच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी शाळांमधून वैज्ञानिक विषयावर व्याख्याने दिली आहेत. तसेच मराठी विज्ञान परिषद व अन्य दिवाळी अंकांतही त्यांनी विज्ञानविषयक लेखन केले आहे.
Reviews
There are no reviews yet.