KACHVEL – काचवेल
₹360.00
Product Highlights
आनंद यादव ह्यांच्या आत्मकथनात्मक लेखनाचा हा अंतिम मनोहरनयनमनोहर टप्पा `झोंबी`, `नांगरणी` आणि `घरभिंती` या आत्मचरित्राच्या तीन खंडांनंतरचा हा चौथा खंड काचवेल. नव्या घरातील सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काचवेल काढण्याची लोकप्रथा आहे. काकणांच्या काचतुकड्यांनी ही वेल रेखली जाते. ही वेल वंशवेलीचंही प्रतीक असते. त्या घराची गृहिणी नकळत स्वतःला वंशवेल मानते. तिची मुलं ही त्या वेलीवरच्या कळ्या, फुलं असतात. जेवढी मुलं, तेवढे तागोरे ती काढते… आईची ही दैवी लोककला मी पहिल्यांदा बघत होतो. यथाकाळ माझी सगळी भावंडं त्या वेलीवर रांगली. मी सोप्यात बसून अभ्यास केला; त्या अभ्यासालाही काचवेलीचा कशिदा मिळाला. पंधरासोळा वर्षे ही वेल तिथं पायघडीसारखी पहुडली. तेव्हापासून मी साठ वर्षांच्या आयुष्यात खूप काचा तुकड्यातुकड्यांनी गोळा केल्या. मला आकर्षक वाटणारे रंगीत तुकडे जपून ठेवले. जागोजागी भेटलेल्या कसबी कासारांनी मला ते प्रेमाने देऊ केले. त्या तुकड्यांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाची वेल सिद्ध झाली. अंतिमत: ही काचवेल आणि तिची भूमी ही मराठी समाजाचं आणि संस्कृतीचं प्रतीकही आहे, असं जाणवलं. मी फक्त भारवाही.
Description
KACHVEL” IS THE SUCCESSOR OF ANAND YADAV`S AUTOBIOGRAPHIES; “ZOMBI`’, “NANGARANI`’, AND “GHARBHINTI`’. IN THE RURAL AREAS IT IS A CUSTOM TO MAKE A DESIGN ON THE FLOOR USING THE BROKEN GLASS BANGLES. THIS IS ALWAYS SHAPED IN THE FORM OF A VEIL INDICATING THE COMING GENERATION. EVERY HOUSEWIFE CONSIDERS HERSELF TO BE THE VEIL, HER OFFSPRING BEING THE VARIOUS BUDS AND FLOWERS BLOOMING. SHE DRAWS AS MANY BRANCHES AS HER CHILDREN. MY MOTHER POSSESSED THIS DIVINE FOLK ART, I SAW HER DIVINITY FOR THE FIRST TIME. IN THE COMING YEARS, ALL MY SIBLINGS CRAWLED ON THE VEIL. IN ITS PRESENCE, I COMPLETED MY STUDIES. THE “KACHVEL` WAS ALWAYS THERE FOR MANY YEARS, RESEMBLING A CARPET. THERE ONWARDS, FOR THE PAST 60 YEARS, I HAVE TRIED TO COLLECT AS MANY BROKEN GLASS PIECES AS POSSIBLE. I HAVE PRESERVED ALL THE GLASS PIECES I THOUGHT WORTHY. THEY WERE GIVEN TO ME BY MANY EXPERIENCED AND DEXTEROUS ARTISTS. THEY HAVE MOULDED ME AS A PERSON. AT THE END, I HAVE FELT THAT THIS `KACHVEL` IS A SYMBOL OF MARATHI COMMUNITY AND CULTURE; WITH ME AS A MERE PORTER.
Brand
ANAND YADAV
Birth Date : 30/11/1935
Death Date : 27/11/2016
साहित्य अकादमी पुरस्कार, गिरणागौरव पुरस्कार नाशिक, सन्मानित साहित्यिक कालीमाता साहित्य पुरस्कार, परिमल लेखन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, राज्य पुरस्कार, रोहमारे ग्रामीण पुरस्कार, रा. ना. सबनीस वाङ्मय पुरस्कार. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. ग्रामीण साहित्यविषयक चळवळीला त्यांनी १९७४ पासून प्रारंभ केला. केवळ विनोद निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रामीण पात्रांच्या आयुष्यातील व्यथा, वेदना, त्यांची भीषण सुखदु:ख त्यांनी जगासमोर मांडली. १९८०पासून आजतागायत अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. साहित्यक्षेत्राशी संबंधित अनेक मंडळे, समित्या यांचे ते सदस्य आहेत. त्यांनी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांत त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पुरस्कार मिळाले आहेत. आनंद यादव यांच्या अनेक साहित्यकृतींचे हिंदी, बंगाली, उर्दू, कन्नड, इंग्रजी, फ्रेंच या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक येथील मराठी विषय असलेल्या विद्यापीठांतून त्यांच्या पुस्तकांचा साहित्यकृतींचा, अभ्यास सातत्याने केला जातो. तसेच क्रमिक, पाठ्यपुस्तकांतूनही त्यांच्या विविध साहित्यकृतींचा सातत्याने समावेश केला जातो. झोंबी हे त्यांचे आत्मचरित्र खूपच लोकप्रिय झाले आहे. या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार व राज्य पुरस्कार यांच्यासह एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Reviews
There are no reviews yet.