Jivhala – जिव्हाळा
₹400.00
Product Highlights
‘जिगसॉ’, ‘जिव्हाळा’, माझं संकल्पितपुस्तक ‘जिज्ञासा’ या तिन्ही पुस्तकांची प्रेरणासमान आहे. माझ्या वाढत्या वयापासून थोरप्रतिभावंत आणि विचारवंत यांच्याशी माझा संबंधयेत गेला. आमच्या योग्यतेतील फरक लक्षात नघेता त्यांनी मला जवळ येऊ दिलं. आमच्यामधीलसंवाद -विसंवाद आणि तरीही स्नेहभावना यांचावेध घेण्याचा माझा चाळा सुरू झाला. गेलीपंचेचाळीस वर्षं तुम्ही ‘माणूस’मधून आणित्यानंतर राजहंस प्रकाशनाच्या माध्यमातून माझ्यालेखनाचा पाठपुरावा करत आलात.मराठी प्रकाशनाच्या कामात माझा ज्यांच्याशीसंपर्क येत गेला त्या गंगाधर गाडगीळ यांच्यापासूनविश्राम आणि मालतीबाई बेडेकर यांच्यापर्यंतयुगप्रवर्तक लेखकांविषयी लिहिताना छाती दडपून जाते.वसंत कानेटकर, दुर्गा भागवत, कुसुमाग्रज,विंदा करंदीकर, ग्रेस सारीच अद्वितीय माणसं. तारावनारसे, ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि श्री.पु. भागवतही माझी अखंड मित्रमंडळी. या सा-यांबद्दल
लिहिणं हे अत्यंत जबाबदारीचं. न लिहावं तरयांच्याशी दीर्घकाल जवळीक साधता आली तीइतरांपर्यंत न पोहचवण्याचा अप्पलपोटेपणा.ते सारं लिहून वाचकांपर्यंत नेण्यात जिव्हाळा हीचमाझी प्रेरणा आणि जिव्हाळा हेच माझं समर्थन.-रामदास
Reviews
There are no reviews yet.