JIV JITHE GUNTALELA – जीव जिथे गुंतलेला
₹300.00
Product Highlights
सत्य घटनांबद्दल लिहिताना डॉ. अतुल गवांदे आपल्या मनाची अशी काही पकड घेतात की वाटते, वैद्यकशास्त्रविषयाची माहिती मिळवण्यासाठी ते त्याचीच चिरफाड करत आहेत. खरं पाहता, सर्वसामान्यांच्या मनात या शास्त्राविषयी एक प्रकारची उदात्ततेची भावना असते. गवांदे मात्र आपल्यासमोर वास्तव ठेवतात, ते त्याच्या मूळ स्वरूपात. हे वास्तव अत्यंत गुंतागुंतीचे असते, गोंधळात टाकणारे असते आणि कमालीचे मानवी असते. ज्या वेळी हे शास्त्र संदिग्ध स्वरूपाचे असते, उपलब्ध माहिती अगदी मर्यादित असते, जोखमीचे प्रमाण मोठे असते अन् तरीही निर्णय घेणे अपरिहार्य होऊन बसते, तेव्हा गवांदे आपल्यापुढे सगळी परिाQस्थती उघडपणे मांडतात, कसलीही लपवा-छपवी करत नाहीत. रुग्णांच्याच नव्हेत; तर डॉक्टरांच्या नाट्यपूर्ण कथाही ते आपल्याला सांगतात तेव्हा त्यामागचा हेतू सत्यशोधनाचा आहे, असे जाणवते. डॉक्टरांच्या हातून घडणाNया चुकांमागची कारणे ते आपल्याला प्रामाणिकपणे सांगतात, चांगल्या शल्यविशारदांना रसातळाला नेण्यामागील कारणांची ते शहानिशा करतात, अनाकलनीय असे वास्तव समोर ठाकल्यानंतर वैद्यकीयशास्त्र त्याला कशा प्रकारे तोंड देते, हे प्रश्न सामान्य वाचकांना गवांदे यांनी सांगितल्यामुळेच कळतात, असे म्हणता येईल. ‘कॉम्प्लीकेशन्स’ हे पुस्तक वाचताना एका बाजूला अतिशय कणखर मनोवृत्तीचे दर्शन घडते, तर दुस-या बाजूला मानवतेचा ओलावाही जाणवतो. वैद्यकीय विषयावरील हे पुस्तक एका वेगळ्याच पठडीतले आहे, असेही मनात येते.
Description
GIVING AN ACCOUNT OF THE LIFE OF A SURGEON, THIS BOOK LOOKS AT WHAT IT IS LIKE TO CUT INTO PEOPLE`S BODIES AND THE – LITERALLY LIFE AND DEATH – DECISIONS THAT HAVE TO BE MADE. IT INCLUDES CHRONICLES OF OPERATIONS THAT GO WRONG; OF DOCTORS WHO GO TO THE BAD; WHY AUTOPSIES ARE NECESSARY; AND WHAT IT FEELS LIKE TO INSERT YOUR KNIFE INTO SOMEONE.
Brand
DR.ATUL GAWANDE
Birth Date : 05/11/1965
डॉ. अतुल गवांदे हे चार लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. कॉम्प्लिकेशन्स, जे पुस्तक नॅशनल बुक अॅवार्डच्या अंतिम फेरीसाठी निवडलं गेलं होतं; बेटर, ज्याची निवड अॅमेझॉन डॉट कॉमनं दहा सर्वोत्तम पुस्तकांमध्ये केली होती आणि द चेकलिस्ट मॅनिफेस्टो हे त्यांचं तिसरं पुस्तक. बोस्टनमधल्या ब्रिहॅम अॅन्ड विमेन्स हॉस्पिटल चे ते शल्यतज्ज्ञ आहेत, द न्यू यॉर्करचे ते लेखक आहेत आणि हॉर्वर्ड मेडिकल स्कूल आणि हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे ते प्राध्यापक आहेत. विज्ञानावर लिहिलेल्या लेखांमुळे त्यांना लेविस थॉमस प्राइझ मिळाले आहे. मॅकऑर्थर फेलोशिप आणि दोन नॅशनल मॅगझिन अॅवार्ड मिळाले आहेत. सामाजिक आरोग्याविषयी त्यांचा सहभाग : ते अरियाडने लॅब्स चे संचालक आहेत, जे आरोग्यप्रणालीच्या पुनर्निर्माणासाठीचं संयुक्त केंद्र आहे आणि लाइफबॉक्स या ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या शस्त्रक्रिया जगभर सुरक्षितपणे व्हाव्यात म्हणून कार्य करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते आणि त्यांची पत्नी कॅथलीन आपल्या तीन मुलांसोबत न्यूटन, मॅसॅच्युएट्स इथे राहतात.
Reviews
There are no reviews yet.