JICHYA HATI PALANYACHI DORI – जिच्या हाती पाळण्याची दोरी
₹280.00
Product Highlights
आयुष्यात नीटपणे स्थिरावलेली दयाळू, उदार आणि अत्यंत यशस्वी ठरलेली असाधारण मुलं त्यांच्या आयांनी कशी घडवली? मुलांचं संगोपन हा मातापित्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. ह्या गहन विषयाचं अन्वेषण करण्याच्या हेतूनं स्टेफनी हर्श यांनी अनेक लोकोत्तर हस्तींच्या मातांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांना सुज्ञपणाची कोणती मौक्तिक सापडली? त्यासाठी वाचा अंत:करणाला भिडणा-या ह्या बोधप्रद मुलाखती! त्याचबरोबर लेखिकेनं लिहिलेलं प्रास्ताविक आणि तिनं केलेला समारोप
Brand
STEPHANIE HIRSCH & HANA SELIGSON
स्टेफनी हर्श यांनी ट्युलेन विद्यापीठातून आर्ट हिस्टरी आणि कॉस्च्युम डिझाईन या विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्ररीत्या स्वत:च्या कामाला सुरुवात केली. आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून स्वत:चा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मणी आणि भरतकामाचा वापर केला की, ज्यामुळे त्यांच्या कलाकृतींना त्रिमितीय स्वरूप प्राप्त झाले. त्यांच्या कलाकृती या विनोद आणि प्रबोधन अशा दोन्ही गोष्टींवर भाष्य करतात. न्यू यॉर्क येथील प्रसिद्ध लिऑन वायर गॅलरी येथे २०११ आणि २०१३ साली स्टेफनी हर्श यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले गेले होते. १९९६ ते २००८ पर्यंत त्यांनी इन्का रिसॉर्ट लाइफ स्टाईल ब्रँडच्या डिझायनर म्हणून काम पाहिले. मियामी येथे भरलेल्या ‘मियामी डिझाइन डिस्ट्रिक्ट आर्ट वॉक’मध्ये विशेष अतिथी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच न्यू यॉर्वÂ येथे भरलेल्या ‘न्यू यॉर्क फॅशन वीक’ मध्येही त्यांना विशेष सन्मान प्राप्त झाला. वेगवेगळी नियतकालिके तसेच वर्तमानपत्रांतून स्टेफनी हर्श यांचे लेखन सतत चालू आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात यांनी एक यशस्वी व्यावसायिक, प्रख्यात डिझायनर, पत्नी तसेच आई अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य आपल्या कुटुंबाबरोबर न्यू यॉर्क शहरात आहे

Reviews
There are no reviews yet.