JAPANESE ORCHID (MARATHI) – जॅपानीज ऑर्किड (मराठी)
₹220.00
Product Highlights
तेत्सुयो अकिनिचो… न्यूयॉर्कमधील एक प्रतिष्ठित, धनाढ्य उद्योजक, डीएनएचा बादशहा. त्याला जगाच्या दुस-या टोकावरून धमक्यांच्या ई-मेल्स येऊ लागतात, ज्यात त्याच्या भयानक कौटुंबिक रहस्याचा उल्लेख असतो. एक असे रहस्य, जे उघड झाल्यास सर्व प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळेल… तेत्सुयोचा वकील, त्याचा गुप्तहेर मित्र आणि एक इतिहासतज्ज्ञ मिळून या रहस्याचे धागेदोरे उलगडत नेऊ शकतील? जपानी ऑर्किडचं रहस्य जगासमोर येईल?
Description
POWERFUL AND YET POIGNANT, THIS THRILLER SPANS THREE CITIES, NEW YORK, TOKYO AND SINGAPORE. TETSUYO AKINICHO, A WEALTHY JAPANESE DNA MOGUL FROM MOST HIGHLY RESPECTED CIRCLES OF NY SOCIETY FINDS HIMSELF EMBROILED IN A BLACKMAIL THAT THREATENS TO TEAR HIS IMPECCABLE REPUTATION TO PIECES. TETSUYO LIVES IN THE SHADOW OF A TERRIBLE FAMILY SECRET WHICH HE THOUGHT WAS WELL HIDDEN, TILL ONE DAY AN EMAIL COMES TO HIM : “YOUR MOTHER IS NOT RESTING IN PEACE. YOU SHOULD BE ASHAMED OF YOUR ANCESTORS. DO PEOPLE KNOW WHERE YOU HAVE COME FROM?” THESE LINES PLUNGE TETSUYO AND HIS LAWYER AKIRA TANAKA INTO AN INTRICATE MAZE OF DAMAGE CONTROL MANOEUVRES INVOLVING PAUL GRIFFIN, A WELL KNOWN AMERICAN PRIVATE INVESTIGATOR AND HIS ASSISTANT, JAPANESE HISTORIAN, MAYUMI ONODERA. THEIR INVESTIGATIONS LEAD TO ONE SHOCKING DISCOVERY AFTER ANOTHER. TETSUYO IS ONCE AGAIN DRAWN BACK TO AN ACHING VOYAGE OF DISCOVERY OF HIS ROOTS & A MYSTERIOUS AND PAINFUL TRAGEDY SURROUNDING THE WOMAN WHO GAVE HIM LIFE… HIS BIOLOGICAL MOTHER. TETSUYO REALIZES THAT NO ONE CAN EVER SHAKE OFF THE PAST, NOT EVEN A POWERFUL MULTI-MILLIONAIRE RIDING HIGH IN HIS WORLD OF SUPER-ADVANCED DNA TECHNOLOGY. THE PAST HE SHARES WITH THE GHOSTS OF SECOND WORLD WAR COME BACK TO HAUNT HIM IN THE FORM OF A FACELESS BLACKMAILER AND TETSUYO IS DRAWN BACK TO CONFRONT THE PLACE WHERE IT ALL STARTED, A JAPANESE CEMETERY IN SINGAPORE AND A TINY, NONDESCRIPT HEAD STONE.
Brand
REI KIMURA
Birth Date : 23/09/1962
रेई किमुरा या व्यवसायाने वकील आहेत, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन न्यूज सिंडिकेटच्या अधिकृत फ्री लान्सर जर्नलिस्टही आहेत; परंतु वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि व्यक्तिमत्त्वांच्या रेखाटनाची त्यांना नैसर्गिक ओढ असल्याने त्यांचे लेखनही वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सत्यावर आधारित घटनांना आपल्या कल्पनाशक्तीने त्या सहजपणे कथारूप देतात. आजपर्यंत त्यांच्या बटरफ्लाय इन द विंड , जॅपनीज रोझ , जॅपनीज ऑर्किड , आवा मारू – टायटॅनिक ऑफ जपान , माय नेम इज एरिक अशा अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच यांतील अनेक कादंबऱ्याचे आतापर्यंत अनेक आशियाई आणि युरोपीयन भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांचे बरेचसे लेखन ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे. ऐतिहासिक काळातल्या अनेक वास्तव घटना, प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वांना त्या आपल्या लेखणीतून जिवंत करतात; परंतु तरीही त्यांचे लेखन केवळ ऐतिहासिक घटना-प्रसंगांपुरते मर्यादित नाही. त्यांनी आपल्या AUM SHINRIKYO-JAPAN S UNHOLY SECT या कादंबरीत १९९५ मध्ये टोकियो सब-वेवर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला आणि त्यातील विदारकता यांचे हृदयद्रावक चित्रण केले आहे. तसेच आपल्या खेळकर शैलीत माय नेम इज एरिक या कादंबरीमधून खट्याळ आणि धमाल उडवणाऱ्या कुत्र्याबद्दलही लिहिलेले आहे. अशा प्रकारे आपल्या लेखनातून त्यांनी विविध प्रकारचे विषय हाताळलेले दिसतात. सामाजिक दृष्टीने संवेदनशील विषयही त्या समर्थपणे पेलताना दिसतात. सातत्याने सत्याचा शोध घेणारे, आव्हानांना सामोरे जाणारे आणि पूर्णत्वासाठी प्रयत्नशील असणारे असे आपले लेखन असावेत, यावर किमुरा यांची श्रद्धा आहे.
Reviews
There are no reviews yet.