JADU TERI NAJAR – जादू तेरी नजर
₹90.00
Product Highlights
“`महाकवी, महानाटककार, महाशेक्सपियर महाचालू! तो म्हणतो, प्रेम प्रेम ते काय? ये तो बस नजर का धोखा है! तुम्ही म्हणा, प्रेम हृदयात असतं… शेक्सपियर म्हणतो, ते नजरेत असतं! कधी कोणाची नजर पडेल, जादू होईल आणि प्रेम जन्माला येईल, हे सांगता येत नाही तशीच त्या प्रेमाला कधी कुणाची नजर लागेल, ते पण आम्हाला नाही रे बाबा माहीत! सगळा मामला नजरेचा!असं आम्ही नाही म्हणत! खुद्द शेक्सपियर सगळ्या नाटककारांच्या बापाचा बाप त्याच्या टमिडसमर नाइट्स ड्रीम या नाटकात म्हणतो…“ शेक्सपियरच्या नाटकाची अद्भुतरम्यता, काव्यमयता न गमावता, त्यातील प्रेमाविषयीचे हे फटकळ तत्त्वज्ञान आत्मसात करून मतकरी ते आपल्या स्वत:च्या शौलीत मांडतात. आजच्या पात्रांच्या आधुनिक संवेदनांसह. शेक्सपियरच्या जगप्रसिद्ध सुखात्मिकेशी समांतर असे आधुनिक जग रचणारे टजादू तेरी नजरछ, व्यावसायिक रंगभूमीवर फार दिवसांनी पाहावयास मिळालेले एक प्रसन्न, रंगीतसंगीत आणि अर्थपूर्ण नाट्यानुभव ठरले आहे
Description
WILLIAM SHAKESPEARE, THE GREAT DRAMATIST, THE GREAT POET, THE GREAT SHAKESPEAR, BUT ALSO GREAT LOAFER! HE SAYS WHAT IS LOVE? LOVE IS LOVE, IT IS THE GAME OF LIFE. LOVE IS BASED IN THE HEART. SHAKESPEARE SAYS IT IS IN THE EYES! YOU NEVER KNOW WHEN IT WILL COME ALIVE. A GLANCE WILL MAKE IT COME ALIVE. BUT THIS SAME LOVE CAN CATCH AN EVIL`S EYE. AN EYE CAN DO WONDERS. WE ARE NOT SAYING THIS, THE GREAT WILLIAM SHAKESPEARE SAYS THIS IN HIS `MIDSUMMER NIGHT`S DREAM`. MATKARI PRESENTS THE IDEA OF LOVE ELABORATED AS PER SHAKESPEARE WITHOUT LOSING ANY CHARM, WITHOUT HURTING THE MEANING, WITHOUT LOSING THE POETIC RHYTHM IN IT IN A NEW WAY, IN A NEW ATMOSPHERE. `JADU TERI NAZAR` IS A FRESH PIECE OF MEANINGFUL DRAMA.
Brand
RATNAKAR MATKARI
Birth Date : 17/11/1938
Death Date : 17/05/2020
रत्नाकर मतकरी यांची १६ फेब्रुवारी, १९५५ रोजी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वेडी माणसं ही एकांकिका प्रथम प्रसारित झाली. तेव्हापासून आजपर्यंत, पन्नास वर्षांहून अधिक काळ, त्यांची समृद्ध कारकिर्द बहरतेच आहे. साहित्य, रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट या विविध माध्यमांतून त्यांनी लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार म्हणून काम केले आहे. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललितलेख अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. नाटकांचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य आणि संगीत यांची संकल्पना, वेषभूषा रेखाटन आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपली कामगिरी अत्यंत निष्ठेने बजावली आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी यांच्या मदतीने त्यांनी बालनाट्य,सूत्रधार आणि महाद्वार अशा तीन नाट्यसंस्था सुरू केल्या. प्रयोगशीलता, निर्मितीची अथक ऊर्जा, चैतन्य, उपक्रमशीलता; तसेच अंतर्मुखता आणि समाजाभिमुखता यांचे संतुलन हे रत्नाकर मतकरींच्या कलावंत-व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू आहेत. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, 2019-20
Reviews
There are no reviews yet.