INTERVIEW TECHNIQUES AND PRESENTATION SKILLS – इटरव्ह्यू टेक्निक्स आणि प्रेझन्टेशन स्किल्स
₹95.00
Product Highlights
इंटरव्ह्यू म्हटले की, इंग्रजीतून बोलणे, टाय लावणे, कडक शेकहँड करणे, अशा गोष्टींनाच अनावश्यक महत्त्व दिले जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा-कॉलेजांत शिकलेली मुले जे काही इंग्रजी बोलतात, त्यामुळे लहान शहरांतील, गावांतील मुले-मुली भारावून जातात. आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही याचा न्यूनगंड त्यांच्या मनात तयार होतो…. नोकरीसाठी अर्ज कसा लिहायचा, स्पर्धा परीक्षेसाठी ग्रुप डिस्कशनची तयारी कशी करायची या सर्व गोष्टींबद्दल त्यांच्यामध्ये अनभिज्ञता असते; त्यामुळे अनेकदा ते आपली माहिती प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. म्हणूनच हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्व लहान-मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये राहणाऱ्या; स्पर्धा परीक्षांची, इंटरव्ह्यूची तयारी करत असलेल्या मुला-मुलींसाठी लिहिलेले आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेला विविध प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, इंटरव्ह्यूच्या वेळेला पाळायचे शिष्टाचार आणि आवश्यक देहबोली (ँद्ब् थ्Aहुल्Aुा) या बद्दलची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे.
Brand
DR.ARUNA KAULGUD
Birth Date : 28/01/1948
अर्थशास्त्रात एम.ए. आणि कॉर्पोरेट प्लॅनिंग अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. अरुणा कौलगुड या ‘व्यवस्थापन सल्लागार, संशोधक, वक्त्या, लेखिका, प्राध्यापक आणि प्रशिक्षक’ म्हणून ओळखल्या जातात. उद्योजकता प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या प्रख्यात ‘निस्बड’ या संस्थेचे ‘ट्रेनर-मोटिव्हेटर’ म्हणून विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. मुंबई व एस.एन.डी.टी. विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले आहे. ऐच्छिक निवृत्तीनंतर त्या व्यवस्थापन सल्लागार व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. विविध संघटनांचे व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास, वर्तन निरीक्षणशास्त्र आणि जीवन कौशल्ये या संबंधित विषयांवर प्रशिक्षण देतात. वल्र्ड बँकेतर्फे श्रीलंकेत त्यांनी ‘इंटरनॅशनल रिव्ह्यूअर’ म्हणून काम केले. जागतिक श्रम परिषद (वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन) आणि एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी ‘व्याख्यात्या-प्रशिक्षक’ म्हणून काम केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, यांच्या संचालक मंडळांवर ‘संचालक’ म्हणून त्यांनी काम केले. मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानच्या ‘सेंटर फॉर इन्स्टीट्युशन बिल्डिंग अॅण्ड लीडरशीप स्टडीज या केंद्राच्या मानद संचालक होत्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर त्या संबंधित होत्या. त्यांनी अनेक पुस्तके, शोधनिबंध, लेख असे विपुल लेखन केलेले आहे.

Reviews
There are no reviews yet.