Indira Antim Parva – इंदिरा : अंतिम पर्व
₹144.00
Product Highlights
सनावली व घटनांच्या जंत्रीतून मांडलेला हा इतिहास नाही. भारताच्या इतिहासावरआपली ठसठशीत मुद्रा उमटवणा-या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अखेरच्याकालखंडाचा साक्षीदार असलेल्या लेखकानं झगमगत्या पर्वाचंघडवलेलं हे दर्शन आहे. पंतप्रधानांचे प्रमुख सचिव म्हणून काम करतानाडॉ.पी.सी.अलेक्झांडर यांना इंदिराजींचे कितीतरी करारी व कोमल पैलू पाहायलामिळाले. नातवंडांत रमणा-या, गंमतशीर किस्से सांगणा-या, परदेश दौ-याततळपणा-या, पंजाब प्रश्नानं सचिंत झालेल्या, राष्ट्रपतींच्या संबंधातील ताणतणावसांभाळणा-या, मंत्रीमंडळ फेररचना अत्यंत गुप्तता बाळगणा-या वसहका-यांना सहसा न दुखावणा-या पंतप्रधान अशी त्यांची नाना रूपं इथंभेटतात. एकदा तर पंतप्रधापदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूकलढवण्याची त्यांची इच्छा होती असं अज्ञात असलेलं सत्य इथं सामोरं येतं.गंभीर-हस-या,पोलादी-प्रेमळ, मुत्सद्दी-मिश्किल अशा इंदिराजींच्या कितीतरी
प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. १९८० ते १९८४ या काळातीलपडद्यामागील घडामोडींचा हा अस्सल, वस्तुनिष्ठ आलेख. जितका ऐतिहासिकतितकाच चकित करणारा.
Brand
अशोक जैन

Reviews
There are no reviews yet.