IMAGINING INDIA – इमॅजिनिंग इंडिया
₹640.00
Product Highlights
समकालीन संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा या पुस्तकात भारताचा प्रदीर्घ इतिहास, गुंतागुंतीचे वर्तमान आणि अनेक शक्यतांना जन्माला घालणारे भविष्य यांचा एक सुसंगत असा अन्वय लावण्याचा प्रयत्न नंदन निलेकणी यांनी केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातल्या समाजवादी धोरणांमागचे तत्कालीन उद्देश कितीही चांगले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या धोरणांची परिणती लोकशाही खिळखिळी करणाऱ्या कुचंबल्या वर्तमानात कशी आणि का झाली, याचे सखोल विवेचन निलेकणी यांनी केले आहे. वर्तमान आणि भविष्य यांचा खंबीर आधार म्हणून उदयाला आलेली भारतातील तरुण लोकसंख्येची दमदार शक्ती हा कळीचा मुद्दा का आहे; याचे विश्लेषण हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होत जाणाऱ्या क्रांतीमुळे केवळ व्यापार, उद्योग आणि सरकारी कारभारातच नव्हे; तर बहुसंख्य भारतीयांच्या आयुष्यात किती रोमांचक परिवर्तन घडते आहे; याचे अत्यंत रोचक वर्णन या पुस्तकात आहे. जातीच्या गणितांवर बेतलेले राजकारण, कामगार क्षेत्रात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या सुधारणा, पायाभूत सुविधांची उभारणी, उच्च शिक्षणाचे क्षेत्र आणि भारतातला इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव यांसारख्या कळीच्या वादग्रस्त मुद्द्यांचे नंदन निलेकणी यांनी विस्ताराने आणि संपूर्णत: नव्या दृष्टिकोनांसह विस्तृत विवेचन केले आहे.
Description
IMAGINING INDIA OFFERS A VISIONARY OUTLOOK ABOUT INDIA AND ITS BURGEONING FUTURE THROUGH THE EYES OF ITS AUTHOR NANDAN NILEKANI, WHO IS AN ACCOMPLISHED BUSINESS LEADER. AN ORIGINAL AND BALANCED PERSPECTIVE ON INDIA’S PAST, PRESENT, AND FUTURE IS PRESENTED IN AN ENGAGING MANNER. THE CENTRAL IDEAS THAT HAVE SHAPED INDIA’S GROWTH ARE REVIEWED STRONGLY INIMAGINING INDIA. INDIA’S EARLIER SOCIALIST POLICIES, WHICH STUNTED ITS GROWTH, IS LOOKED AT CRITICALLY. THE BOOK TRACES THE POLICIES AND EFFORTS OF THE PAST AND PRESENT LEADERS, WHEREIN THEY TRIED TO DEVELOP NEW FRAMEWORKS TO SUIT INDIA’S CHALLENGES. THE AUTHOR LAYS EMPHASIS ON THE ROLE PLAYED BY THE YOUTH OF THE COUNTRY IN ITS DEVELOPMENT. FURTHER, HE THROWS LIGHT ON THE IMPACT OF INFORMATION TECHNOLOGY ON BUSINESS AND GOVERNANCE. OTHER TOPICS COVERED INCLUDE LABOUR REFORM, CASTE POLITICS, URBANISATION, INFRASTRUCTURE, HIGHER EDUCATION, ENGLISH LANGUAGE, AND GLOBALISATION. HE CHARTS IDEAS THAT ARE PIVOTAL TO INDIA’S FUTURE GROWTH, AND STRESSES THAT NEW IDEAS FOR SOCIAL SECURITY, ENVIRONMENT, PUBLIC HEALTH, ETC. ARE REQUIRED TO SECURE INDIA’S FUTURE.
Reviews
There are no reviews yet.