HE ADIMA, HE ANTIMA – हे आदिमा, हे अंतिमा
₹350.00
Product Highlights
या कादंबरीत चार पिढ्यांची कहाणी सांगितलेली आहे. हिमोफिलिया हा भयंकर रक्तदोषाचा आजार रमा, सुधा, अंजली या तीन वाहक स्त्रियांद्वारा पुढल्या पिढीकडे संक्रमित झाला आहे. आपल्या समाजातील एका संपन्न घराण्याची ही प्रातिनिधिक कहाणी आहे. या स्त्रिया या आजाराविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या लाडक्या मुलांच्या भयानक वेदनामय, दुःखी जीवनासाठी आपण कारणीभूत आहोत,या वास्तवाची त्यांना पुसटशी कल्पनाही नाही. श्रुतीच्या मातुल घराण्याच्या तीन पिढ्यांच्या तीन स्त्री-प्रतिनिधींची ही कथा आहे. ‘हिमोफिलिया’ नामक रोगाने, महाराक्षसाने, त्यांचे सुख-चैन खाऊन टाकले. पहिल्या दोन पिढ्या तर या भयंकर व्याधीविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होत्या. श्रुतीच्या आईची- अंजलीची प्रथम या वास्तवाशी ओळख झाली. त्याच वेळी तिच्या आजीलाही हे भयंकर कटू सत्य कळले आणि ती कोसळलीच! ‘हिमोफिलिया’ हा जरी या कथनाचा मुख्य विषय असला, तरी त्या अनुषंगाने प्रत्येक पिढीच्या, कालप्रवाहाच्या ओघात बदलणाNया सामाजिक, आर्थिक, भौतिक, मानसिक वातावरणाशीही वाचकांची ओळख व्हावी, त्या काळातसुद्धा, गाव आणि शहरी जीवनातील राहणी, सुखसोयींतला फरक कळावा, अशी लेखिकेची मनापासून इच्छा होती. म्हणूनच श्रुतीच्या पणजीचे, आजीच, आईचे बालपण, शालेय जीवन, लग्न, सासरची माणसे, सणवार, रूढी, परंपरांचे सविस्तर वर्णन रेखाटण्याचा प्रयत्न या कहाणीत करण्यात आला आहे. कादंबरीच्या शेवटी त्या अनुषंगाने सामान्य माणसालाही समजेल अशा सोप्या भाषेत या रोगाचा इतिहास, लक्षणे, खबरदारीचे उपाय, सामान्यांना सजग करणे हे सर्व कादंबरीमार्पÂत मोठ्या कौशल्याने लेखिकेने केले आहे.
Brand
SUVARNA DHOBALE
सौ. सुवर्णा रमेश ढोबळे यांनी एम.ए., बी.एड्. आणि बी.जे. देखील केले आहे. वसंत, माहेर, मेनका, गृहशोभिका अशा अनेक मासिकांतून त्यांच्या चाळीसच्या वर कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची मुहूर्त ते औक्षवंत व गान पाऊस ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. औरंगाबादच्या नभोवाणी केंद्रासाठी त्यांनी कथा, संगीतिका, श्रुतिका, रूपके, प्रवासवर्णनपर लेख इ. प्रकारचे लेखन केले आहे. तसेच दै. मराठवाडा, तरुण भारत, लोकमत, दै. सकाळ आदी वृत्तपत्रांमधूनही त्या नियमितपणे लेखन करतात. वसंत मासिकाचा कै. पद्मावती देशपांडे पुरस्कार व दक्षता मासिकाचे दोन पुरस्कार सौ. सुवर्णा ढोबळे यांच्या नावावर आहेत.
Reviews
There are no reviews yet.