Brand
ANANT BHOYAR
Birth Date : 26/11/1965
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथे भोयर यांचा जन्म झाला. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदविका घेतली. शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. ते ग्रामीण कथा, कादंबरी, ललित, कृषीविषयक, वैचारिक या प्रकारचे लेखन करतात. त्यांचे मायाजाळ, हराळी, शिरान, हबकमुड्डे हे कथासंग्रह तर आभाळझुंज ही कादंबरी आणि सेंद्रिय खते हा कृषीविषयक तंत्रज्ञानविषयक लेख तसेच मोबाईल ही कथा प्रसिद्ध आहे. ते मराठीतील प्रमुख मासिके, नियतकालिके, दिवाळी अंकांतून कथा व वैचारिक लेखन करतात. त्यांच्या कथा, मालिका व नभोनाट्यांचे आकाशवाणीवरून प्रसारण होते. भोयर यांना मायाजाळ या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार (सन १९९४), आभाळझुंज कादंबरीस रसिकरचनातर्फे साहित्यसाधना पुरस्कार (सन २००७), ग्रामीण साहित्य लेखनाकरिता शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार (सन २०१०), आभाळझुंज ला प्रा. सदाशिव कुल्ली स्मृती साहित्यवैभव पुरस्कार (सन २०१२) आणि महाराष्ट्र राज्याचा सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार (सन २००९) असे पुरस्कार मिळाले आहेत.
Reviews
There are no reviews yet.