GUNTAVNUKICHI KAMDHENU – गुंतवणुकीची कामधेनू
₹320.00
Product Highlights
श्रीमंत होण्यासाठी शेअर मार्केट ही एक गुरुकिल्ली आहे. या व्यापारामध्ये अनिश्चित परिपूर्णता आहे. पण बाजाराच्या सखोल अभ्यासानुसार ही अनिश्चितता आपण संधीमध्ये बदलू शकतो. डॉ. अनिल गांघी याचे ‘गुंतवणुकीची कामधेनू’ हे पुस्तक आपल्याला कमी जोखीमीसह गुंतवणुकीचा मार्ग दाखवते.
Description
SHARE MARKET IS A KEY TO BECOME RICH AND WEALTHY , BUT THIS TRADE IS FULL OF UNCERTAINTIES. BUT ONE CAN TURN THIS UNCERTAINTIES INTO OPPORTUNITIES BY DETAILED STUDY OF THE MARKET. THE BOOK GUNTAVNUKICHI KAMDHENU BY DR.ANIL GANDHI GIVES YOU THE PATH FOR INVESTMENTS WITH MINIMAL RISK INVOLVEMENT.
Brand
ANIL GANDHI
डॉ. अनिल गांधी यांचा जन्म १९३९ मध्ये माढा (सोलापूर) येथे झाला. त्यांनी १९६३ला एम.बी.बी.एस. झाल्यानंतर पुण्यामध्ये फॅमिली फिजिशियन म्हणून पाच वर्षें प्रॅक्टिस केली. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरला. १९७१ला ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलमधून एम.एस. झाले. याच काळात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पेशंट्सवर उपचार करण्यासाठी त्यांना औषधांपासून ऑपरेशनपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ते १९६६ ते ८६ अशी वीस वर्षे खेड्यापाड्यांमध्ये जात होते. १९७०ला गांधी हॉस्पिटल सुरू झाले. तिथपासून आजपर्यंत त्यांनी हजारो ऑपरेशन्स केली; त्याद्वारे एक कुशल सर्जनअशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सेंट माक्र्स हॉस्पिटल, लंडन येथून १९७४ ला कोलोरेक्टल सर्जरीमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केले. नंतर १९८४ पर्यंत परदेशात अनेक ठिकाणी त्यांनी शोधनिबंध सादर केले. बी.जे. मेडिकल कॉलेज, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, धोंडूमामा साठे होमिओपॅथी कॉलेज येथे मानद प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. याचबरोबर सामाजिक कार्याच्या तळमळीतून त्यांनी लोणावळ्याजवळील पांगळोली या आदिवासी वस्तीत आरोग्य, शिक्षण व विकासकार्य सुरू केले. पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय एकात्मता अभियानात त्यांचा मनापासून सहभाग होता. २०११मध्ये पुणे व वाई येथील वसंत व्याख्यानमालेत व्याख्याने. मना सर्जना या आत्मकथनपर लेखनाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद. दै. महाराष्ट्र टाइम्सच्या सगुण-निर्गुण या सदरात लेखमाला प्रसिद्ध. तसेच सकाळ, साप्ताहिक सकाळ आणि लोकसत्ता यातून विविध लेख. मनासर्जना (आत्मवृत्त) या पुस्तकाला बडोदा साहित्य परिषदेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाले. या पुस्तकाचे गुजराथी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवाद झाले. धन्वंतरी घरोघरी, विचारी मना, शोध मनाचा, संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची या पुस्तकाचा उल्लेखनीय पुस्तक म्हणून विज्ञान परिषद मुंबईने गौरविले. या कातरवेळी – आनंदी वृद्धत्वाकडे वाटचाल आणि त्याचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर एकाचवेळी प्रसिद्ध झाले. कालनिर्णय आरोग्य २०१७ मध्ये संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची प्रदिर्घ लेख छापून आला आहे.

Reviews
There are no reviews yet.