GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA – ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या
₹195.00
Product Highlights
ग्रामीण साहित्याचा सर्वांगीण अभ्यास करणारा हा मराठीतील पहिलाच ग्रंथ. मराठी ग्रामीण कथा, कादंबरी,कविता या साहित्य-प्रकारांचे ऐतिहासिक स्वरूप तर ग्रंथकाराने विशद करून दाखविलेच आहे; शिवाय त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक तात्त्विक प्रश्नांची उत्तरे साहित्यशास्त्रीय भूमिकेवरून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यकाळातील ग्रामीण साहित्यातल्या पहिल्या पिढीच्या अनेक मर्यादाही ग्रंथकाराने स्पष्ट केल्या आहेत.ग्रामीण भाषेसंबंधीचे आपले विचार निर्भीडपणे मांडून नव्या पिढीच्या ग्रामीण साहित्याचे स्वरूप, या पिढीच्या ग्रामीण लेखकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या साहित्यविषयक अडचणीही दाखवून दिल्या आहेत. एकूण मराठी साहित्यात ‘ग्रामीण साहित्याचे स्थान’ नेमके काय आहे, हे धीटपणे सांगितले आहे.ग्रामीण साहित्याच्या संदर्भात या गोष्टी प्रथमच चिकित्सक रसिकांच्या समोर येत आहेत. ग्रामीण साहित्याची स्वत: निर्मिती करणाऱ्या डॉ. आनंद यादव यांनी एकूण ग्रामीण साहित्याचा केलेला विचार त्यांच्या स्वानुभवाचे तेज घेऊन आल्याचे ग्रंथातील अनेक प्रखर आणि परखड विधानांतून जाणवते.
Description
THIS WORK WHICH FOCUSSES ON RURAL MARATHI LITERATURE IS A COLLECTION OF 17 ARTICLES WRITTEN BETWEEN 1968 AND 1979. THE AUTHOR WHO IS A SENIOR AND EMINENT AUTHOR AND LITERARY
Brand
ANAND YADAV
Birth Date : 30/11/1935
Death Date : 27/11/2016
साहित्य अकादमी पुरस्कार, गिरणागौरव पुरस्कार नाशिक, सन्मानित साहित्यिक कालीमाता साहित्य पुरस्कार, परिमल लेखन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, राज्य पुरस्कार, रोहमारे ग्रामीण पुरस्कार, रा. ना. सबनीस वाङ्मय पुरस्कार. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. ग्रामीण साहित्यविषयक चळवळीला त्यांनी १९७४ पासून प्रारंभ केला. केवळ विनोद निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रामीण पात्रांच्या आयुष्यातील व्यथा, वेदना, त्यांची भीषण सुखदु:ख त्यांनी जगासमोर मांडली. १९८०पासून आजतागायत अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. साहित्यक्षेत्राशी संबंधित अनेक मंडळे, समित्या यांचे ते सदस्य आहेत. त्यांनी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांत त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पुरस्कार मिळाले आहेत. आनंद यादव यांच्या अनेक साहित्यकृतींचे हिंदी, बंगाली, उर्दू, कन्नड, इंग्रजी, फ्रेंच या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक येथील मराठी विषय असलेल्या विद्यापीठांतून त्यांच्या पुस्तकांचा साहित्यकृतींचा, अभ्यास सातत्याने केला जातो. तसेच क्रमिक, पाठ्यपुस्तकांतूनही त्यांच्या विविध साहित्यकृतींचा सातत्याने समावेश केला जातो. झोंबी हे त्यांचे आत्मचरित्र खूपच लोकप्रिय झाले आहे. या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार व राज्य पुरस्कार यांच्यासह एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Reviews
There are no reviews yet.