GRAMIN BOLICHA SHABDAKOSH – ग्रामीण बोलीचा शब्दकोश
₹140.00
Product Highlights
शब्द आणि शब्दांनी तयार झालेली भाषा ही मानवाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. हे शब्द, ही भाषा दैनंदिन व्यवहाराचे साधन, ज्ञानसंपादनाचे माध्यम असते. प्रत्येक भाषेतील शब्दसौंदर्य हे त्या समाजाच्या संस्कृतीचे दर्शक असते. अठरापगड जाती तसेच शहरी व ग्रामीण भागात विभागलेल्या भारतीय समाजात वापरात असलेल्या बोली भाषेतील अनेक शब्द हे अभिव्यक्तीच्या दृष्टीने अतिशय प्रभावी, अचूक अर्थ प्रकट करणारे आणि ताजे टवटवीत असतात. परंतु हे शब्द वापरात राहिले नाही तर ते विस्मृतीत लोप पावतात. आपल्या लोकजीवन आणि लोकसंस्कृतीतील कितीतरी शब्द ‘अर्थपूर्ण’ असूनही हळूहळू लोप पावत चालले आहेत. अशा लोप पावत चाललेल्या बोलीमधील शब्दांची अतिशय मनोरंजक ओळख या संग्रहातून करून दिली आहे. या शब्दांची ओळख करुन देताना, त्यांच्या व्युत्पत्तीवर फारसा भर न देता ग्रामीण लोकजीवनात तो कसा, कोणत्या अर्थाने वापरला जात होता, त्याचा विस्तार कसा होत गेला, यावर अधिक भर देण्यात आला आहे. लोप पावणाऱ्या लोकसंस्कृतीच्या या शब्दरूपी सुवर्णमुद्रांना झळाळी देण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न.
Description
WORDS AND THE LANGUAGE THEREAFTER IS THE GREATEST BOON TO THE MANKIND. WORDS ARE THE MEDIUM OF ACQUIRING KNOWLEDGE, FULFILLING OUR DAILY NEEDS AND AFFAIRS. EVERY LANGUAGE HAS ITS OWN BEAUTY WHICH IS REVEALED IN THE CULTURE OF EVERY SOCIETY. INDIA HAS A VERY RICH AND VARIED HERITAGE. INDIAN LANGUAGE IS ALSO EQUALLY RICH AND VARIED. THE LANGUAGE DIFFERS FROM REGION TO REGION, STATE TO STATE, AND COMMUNITY TO COMMUNITY. EACH LANGUAGE IS FULL OF BEAUTIFUL WORDS EXPRESSING THE FEELINGS IN PERFECT WORDS. BUT IF NOT USED, THESE WORDS WOULD SOON BECOME A THING OF PAST. TODAY, WE ALL ARE AWARE THAT MANY POWERFUL AND MEANINGFUL WORDS HAVE ALREADY BEEN EXTINCT. WITH TE PURPOSE OF GIVING THROUGH THIS BOOK, THE AUTHOR HAS ATTEMPTED TO BRING BACK MANY SUCH FORGOTTEN WORDS, HE HAS COMPILED THEM TOGETHER FOR OUR PERUSAL AND A NEW DIMENSION TO THE MARATHI LANGUAGE TO BRING BACK SOME OF ITS GLORY. HE DOES NOT BOTHER MUCH TO FIND THE ORIGIN OF THE WORDS, ON THE CONTRARY HE STRIVES TO MAKE US FAMILIAR WITH THEM BY PRESENTING A BIT OF ITS HISTORY AND EXAMPLES TO RELATE THEIR PERFECT USE. THIS IS SURELY A VERY GOOD ATTEMPT TO BRING BACK THE FORGOTTEN WORDS TO THE PRESENT; ONCE AGAIN.
Reviews
There are no reviews yet.