GOSHTA DOTCOM ANI ITAR BODHKATHA:BHAG-3 – गोष्ट डॉटकॉम आणि इतर बोधकथा:भाग -३
₹280.00
Product Highlights
९७ बोधकथांचा हा संग्रह म्हणजे संस्कारांची शिदोरीच आहे. या छोट्या छोट्या बोधकथांच्या शेवटी कथेतून काय बोध घ्यावा आणि त्यासाठी कोणता संकल्प करावा हेदेखील मुलांना सांगितले आहे. लहान वयात मुलांच्या कोवळ्या मनावर जे संस्कार होतात, ते पुढे दीर्घ काळ टिकवून राहतात. मुलांच्या कोवळ्या मनावर ज्ञानदा नाईक यांच्या या बोधकथा नक्कीच प्रभाव पाडतील. या कथांमधून नम्रता, सहकार्य, विश्वास, संयम, आदर, प्रामाणिकपणा यांसारखी मूल्ये बालकांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध त्यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या बोधकथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कथा सांगताना त्यांना परी, यक्ष, जादू अशा मुलांच्या कल्पनांमध्ये असणाऱ्या शब्दांचा छान वापर केला आहे. मुलांनी आपले स्वभावगुण ओळखावेत, डायरी लिहावी, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा, क्षमाशील व्हावे, चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, निसर्गावर- प्राणिमात्रांवर प्रेम करावे असे संदेश या बोधकथा देतात. मनोरंजन आणि संस्कार यांचा सुरेख मेळ या कथांमधून ज्ञानदा नाईक यांनी घातला आहे.
Brand
DNYANDA NAIK
Birth Date : 21/04/1975
सुप्रसिद्ध ग्रामीण कथालेखक कै. व्यंकटेश माडगूळकर व त्यांच्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळातील अभिनेत्री बेबी विमल यांच्या पोटी २१ एप्रिल, १९५० रोजी ज्ञानदा यांचा जन्म झाला. त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी व मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ , पुणे तर्फे प्रसिद्ध होणाऱ्या किशोर मासिकाच्या कार्यकारी संपादक या पदावरून २९ वर्षांच्या सेवेनंतर त्या २०१०मध्ये सेवानिवृत्त झाल्या. पाठ्यपुस्तक मंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी १९९२ ते २०१० या काळात काम पाहिले. कम्युनिटी एड अॅन्ड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम , भारतीय जैन संघटना आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संस्थांमध्येही त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. आतापर्यंत त्यांची ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्यांपैकी ४० बालवाङ्मयातील आहेत. बालवाङ्मय : नवी इसापनीती , रूव्या बुरूज आणि धाडसी चमू , बागेचे रहस्य , बाबी पत्रकार झाली , क्लाराज डायरी (भाषांतर), रेडी-स्टेडी गो याशिवाय अमेरिकेच्या अंतरंगात , कलावंत विचारवंत , महाराष्ट्रातील प्रतिभावंत कलावंत , आदिशक्ती , ही पुस्तके विशेष गाजली. पुरस्कार : मुंबई पत्रकार संघाचे उत्कृष्ट संपादक यासाठीचे केशवराव कोठावळे पारितोषिक (२००३), उत्कृष्ट बालसाहित्य लेखिका यासाठी, ग. ह. पाटील पारितोषिक (१९९८) तसेच माय व्हिलेज साठी दूरदर्शन केंद्र, नवी दिल्लीच्यावतीने उत्कृष्ट माहितीपट पारितोषिक व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त म्हणून २००५पासून काम पाहत आहेत. प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग.
Reviews
There are no reviews yet.