GOLD FINGER – गोल्ड फिंगर
₹180.00
Product Highlights
जेम्स बाँड ००७ वास्तव वाटावी अशी, आजही जगावर अधिराज्य गाजवणारी व्यक्तिरेखा. सौंदर्यवतींना रमवणारा आणि खलनायकांना ठेचणारा हिकमती योद्धा, हेर. ‘गोल्डफिंगर’ या संशयास्पद असामीचा वेध घेण्याची कामगिरी बाँडवर सोपवली जाते… रहस्याचे धागे उलगडू लागतात… गोल्डफिंगरला सोन्याचं वेड तर असतंच; पण त्याचं असं सोनेरी साम्राज्यच असतं… ‘स्मर्श’ या रशियाच्या खुनशी हेर संघटनेशी संधान असणा-या गोल्डफिंगरनं एक महाकारस्थानही आखलेलं असतं… मोठा नरसंहार होईल, अमेरिका हादरून जाईल एवढं भयावह… आजच्या अतिरेकी कारवायांशी नातं सांगणारं… ही आपत्ती टाळणं शक्य असतं फक्त जेम्स बाँडला! शह-काटशह, कपट-कारस्थानं, रहस्यानं भारलेलं दमदार बाँड-नाट्य… ‘गोल्डफिंगर!’
Description
JAMES BOND 007; A PERSONALITY WHOM WE FIND TO BE VERY REAL, EVEN TODAY, RULING THE WORLD, A HERO ENTERTAINING THE BEAUTIFUL LADIES AND AT THE SAME TIME KILLING THE VILLAINS, A SPY. BOND IS ASSIGNED WITH THE TASK OF FINDING THE SUSPECTED `GOLD FINGER`. HE STARTS REVEALING THE SECRET, ONE BY ONE, HE COMES ACROSS THE CLUES WHILE REACHING THE `GOLD FINGER`, WHO IS CRAZY FOR GOLD AS HIS NAME SUGGESTS, BUT HE RULES HIS GOLDEN KINGDOM TOO. HE HAS SET UP A TERRIBLE PLAN WITH THE RUSSIAN SECRET AGENTS, SMARSH. SO TERRIBLE THAT IT WOULD SHATTER AMERICA WITH THE KILLING OF SO MANY. ACCEPTING THE RELATIONS WITH THE TERRORIST ACTIVITIES. ONLY JAMES BOND CAN STOP THIS CALAMITY. A NEW DRAMA BY BOND, FULL OF SUSPENSE, CHECK AND CHECKMATE, TREACHERY AND CONSPIRACY.
Brand
IAN FLEMING
Birth Date : 28/05/1908
इयान फ्लेमिंग यांचा जन्म २८ मे, १९०८ रोजी लंडनमधील ग्रीन स्ट्रीट येथे झाला. त्यांचे शिक्षण इटन महाविद्यालायात झाले. उच्चशिक्षणासाठी ते जर्मनी आणि ऑस्ट्रिया येथे गेले. सुरुवातीचा काही काळ रायटर्स न्यूज एजन्सी येथे काम केल्यावर ते शेअर मार्केटमध्ये स्टॉकब्रोकर म्हणून काम करू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पूर्ण वेळ नौदलातील हेरखात्यात असिस्टंट डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते. महायुद्धाच्या नंतर इयान फ्लेमिंग यांनी केम्स्ले , संडे टाइम्स या आणि इतर काही वर्तमानपत्रांसाठी परराष्ट्रीय बातमीदार म्हणून काम केले. १९५२ साली त्यांनी कसिनो रॉयल ही थरारक कादंबरी लिहिली. याच कादंबरीतून त्यांनी जेम्स बाँड – एजंट ००७ हे पात्र जगासमोर आणले. पुढील आयुष्यात त्यांनी जेम्स बाँड या पात्राभोवती गुंफलेल्या तेरा कादंबऱ्या लिहिल्या. या सर्व कादंबऱ्या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. या कादंबऱ्यावर चित्रपटही निघाले. १९६२ साली हृदयविकाराशी झगडता झगडता त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी – वॅÂस्परसाठी – एका उडणाऱ्या गाडीवर आधारित चिटी चिटी-बँग बँग ही कथा लिहिली. १२ ऑगस्ट, १९६४ साली केंट येथे त्यांचा मृत्यू झाला.
Reviews
There are no reviews yet.