Description
I HAVE ALWAYS LOVED TO SOLVE PUZZLES. NOT THOSE WHICH WE GET IN THE MARKET, BUT THOSE WHICH WERE IN THE FORM OF PEOPLE OR FAMILIES. I ALWAYS TRIED TO SOLVE THEM. SOME TOOK FORM OF STORIES, BUT THE MAIN PUZZLE REMAINED AS IT IS. MY SLATE WAS ALWAYS BLANK. THE WORDS WERE WIPED OFF BUT SCRATCHES REMAINED AS IT IS. I KNOW THAT ONE SUCH DAY WILL COME INTO MY LIFE, IT WILL MARK MY LIFE WITH A BIG SCRATCH AND I WILL HAVE TO BID GOODBYE FOREVER TO ALL; I AM NOT SCARED OF IT BUT I WILL REGRET GOING AWAY FROM THIS WORLD – VA PU.
Brand
V.P.KALE
Birth Date : 25/03/1932
Death Date : 26/03/2001
लेखक, कथाकथनकार, आर्कीटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या. मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला पॅटर्न म्हणायचे. वपुंनी पॅटन्र्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटन्र्सना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक रंग मनाचे दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१… आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा हुंकार अजूनही वन फॉर द रोड करता दिला-घेतला जातोय. हा दोस्त असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार..
Reviews
There are no reviews yet.