GABAL – गबाळ
₹250.00
Product Highlights
मानव समाजातीलच एक घटक, ज्याला स्वत:चे असे अस्तित्व नाही अशा घटकाचे- `कुडमोडे जोशी` या जातीचे- जीवन विस्तारित स्वरूपात येथे आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र आज या सत्य परिस्थितीला तोंड देत आहे. भटक्या जमातीची दु:खे, त्यांच्या व्यथा, वेदना, स्त्रियांचे पशुतुल्य जीवन, त्यांच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा याविषयीचा सत्य वृत्तान्त यात सादर केला गेला आहे.
Description
THE AUTHOR WHO IS NOW AN ASSOCIATE PROFESSOR IN THE DEPARTMENT OF EDUCATION AND SOCIAL SCIENCES IN NASHIK BELONGS TO THE NOMADIC JOSHI (ASTROLOGERS LOW IN THE CASTE HIERARCHY) TRIBE IN MAHARASHTRA. GABAL IS HIS AUTOBIOGRAPHY WHICH COVERS HIS CHILDHOOD AND EARLY YOUTH. AS HIS FAMILY HAD NO PERMANENT RESIDENCE, DADASAHEB HARDLY HAD AN OPPORTUNITY TO ATTEND SCHOOL, AND UNTIL THE AGE OF ALMOST SEVEN, HE TOOK TO THE FAMILY TRADITION OF BEGGING AND EARNING HIS LIVELIHOOD. AGAINST ALL ODDS SUCH AS ABJECT POVERTY, SUPERSTITION, DISCOURAGEMENT FROM THE ELDERS IN THE COMMUNITY, DADASAHEB CONTINUED HIS EDUCATION UNTIL GRADUATION. AFTER COMPLETING HIS HIGHER SECONDARY, HE SUPPORTED HIS EDUCATION INITIALLY BY DOING MENIAL JOBS AND LATER ACTING, AND BY SCHOLARSHIP. THE TITLE OPENS A WINDOW ON THE LIFE OF THE DOWNTRODDEN, AND PARTICULARLY THEIR DIALECT.
Brand
DADASAHEB MORE
Birth Date : 01/06/1961
गबाळ या आत्मकथनासाठी १९८४ मध्ये राज्य पुरस्कार मिळणाऱ्या श्री. दादासाहेब मल्हारी मोरे यांचा जन्म १ जून १९६१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील बावची येथे झाला. सध्या नशिक येथे वास्तव्य असलेल्या दादासाहेबांनी प्रथम श्रेणीत एम. ए. (मराठी) पदवी प्राप्त केली असून, सेट परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे सहयोगी प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. गबाळ या आत्मकथनाबरोबरच त्यांचे दुस्काळ कादंबरी, विमुक्त कथासंग्रह, अंधाराचे वारसदार कादंबरी हे (मेहता प्रकाशन) व इतर विपुल साहित्यलेखन प्रसिद्ध आहे. गबाळ या आत्मकथनाला राज्य पुरस्काराबरोबरच मुकादम साहित्य पुरस्कार, विमुक्त कथासंग्रहाला मसाप चा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, अंधाराचे वारसदार (कादंबरी) कार्तिकेय साहित्य पुरस्कार, विळसा कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी श्री. मोरे यांचे लेखन नावाजले गेले आहे. कथा, कादंबरी, आत्मकथन या विविध साहित्यप्रकारांबरोबरच दलित साहित्याचे योगदान , शिक्षणातून सामाजिक परिवर्तन , जागतिकीकरण आणि भटक्या-विमुक्त साहित्याचा वाङ्मयप्रवाह असे शोधनिबंध त्यांनी चर्चासत्रांतून सादर केले आहेत. गबाळ चे अनुवाद कन्नड, इंग्रजी, हिंदी भाषांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या सकस लेखनावर पीएच.डी संशोधनाबरोबरच अभ्यासक्रमामध्येही ( गबाळ या कादंबरीचा बी.ए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ, एम. ए. शिवाजी विद्यापीठ, एम. ए. गोंडवना विद्यापीठ, तसेच विमुक्त या कथासंग्रहातील कसरत ही कथा बालभारती पुस्तकात, विमुक्त या कथासंग्रहाचा गुलबर्गा विद्यापीठ ) समावेशाचा सन्मान त्यांना लाभला आहे. कोल्हापूर, बेळगाव, निगवे दुमाला, अहमदापूर येथील निरनिराळ्या संमेलनांचे अध्यक्षपद भूषवण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे.
Reviews
There are no reviews yet.