FROM RUSSIA WITH LOVE – फ्रॉम रशिया विथ् लव्ह
₹250.00
Product Highlights
नाव : जेम्स बाँड, उंची : १८३ सें. मी. वजन : ७६ किलोग्रॅम्स, सडसडीत बांधा, डोळे : निळे, केस : काळे, उजव्या गालावर आणि डाव्या खांद्यावर ओरखड्याचे वण, तालीमबाज, पिस्तुलबाजीमध्ये निष्णात, उत्तम मुष्टीयोद्धा, सुरे फेकण्यात तरबेज, वेषांतर करत नाहीे, फ्रेंच आणि जर्मन भाषा येतात, धूम्रपानाचं जबरदस्त व्यसन (तीन सोनेरी रिंगांच्या खास सिगरेटस् ओढतो), दुर्गुण : मद्यपान करतो पण अति मद्य घेत नाही, स्त्रियांचा मोह. जगामधल्या प्रत्येक मोठ्या देशातल्या गुप्तचरखात्यामध्ये ब्रिटिश सीव्रेÂट एजंट जेम्स बाँड याची संपूर्ण माहिती असलेली फाईल मौजूद आहे. स्मर्श या रशियन गुप्तचर संघटनेनं जेम्स बाँडला लक्ष्य बनवलं : त्याचा वध करण्यासाठी. जेम्स बाँडला मोहिनी घालण्यासाठी त्यांनी तातिआना रोमानोवा या रूपसुंदर तरुणीची निवड केली. जेम्स बाँडला इंग्लंडहून इस्तंबूलपर्यंत खेचून आणणं आणि त्याला आपल्या मोहजालात अडकवणं हे तिचं काम होतं. पुढला सगळा पाताळयंत्री कट तिचे वरिष्ठ घडवून आणणार होते. स्मर्शनं लावलेल्या या सापळ्यात जेम्स बाँडनं आपण होऊन प्रवेश केला. या घातकी खेळामध्ये भुरळ पाडणारी तातिआना आणि रशियनांचं स्पेक्टर यंत्र ही दोन प्रमुख आमिषं होती. आणि – आणि या भयंकर खेळाचा शेवट अगदी निश्चित होता. तो म्हणजे जेम्स बाँडचा मृत्यु…! फ्रॉम रशिया विथ् लव्ह. डेली मेल, संडे टाइम्स या वृत्तपत्रांनी गौरवलेल्या इयान फ्लेमिंगच्या या जबरदस्त कादंबरीचा हा उत्कंठावर्धक मराठी अनुवाद.
Description
NAME: JAMES BOND; HEIGHT: 183 CMS; WEIGHT: 76 KG; BUILD: MEDIUM; EYES: BLUE; HAIR: BLACK; SCARS ON RIGHT CHEEK AND LEFT SHOULDER, EXPERT IN GUNMANSHIP, EXCELLENT BOXER, EXCELLENT IN KNIFE THROWING; DOES NOT DISGUISE, KNOWS FRENCH AND GERMAN LANGUAGES FLUENTLY. A CHAIN SMOKER; SMOKES SPECIAL CIGARETTES WITH THREE GOLDEN RINGS. VICE: LOVES DRINKING BUT NOT AN ADDICT; LOVES WOMEN. THERE IS A FILE ON JAMES BOND, CONTAINING ALL THE INFORMATION ABOUT HIM, JUST LIKE ALL THE SECRET SERVICE AGENTS THROUGHOUT THE WORLD. THE RUSSIAN SECRET SERVICES SMARSH TARGETS BOND, THEY WANT TO KILL HIM. THEY SELECT THE RUSSIAN BEAUTY QUEEN TATIANA ROMANOV FOR THIS ASSASSINATION. HER JOB IS TO MAKE JAMES BOND COME WITH HER FROM ENGLAND TO ISTANBUL. THE NEXT STEP OF THE PROJECT WAS TO BE COMPLETED BY HER SUPERIORS. JAMES BOND WILLINGLY ENTERS THE TRAP SET UP BY SMARSH. HE HAS TWO BAITS FOR HIMSELF IN THIS DANGEROUS GAME, ONE THE BEAUTIFUL TATIANA AND THE OTHER RUSSIA`S SPECTER CENTER. THE END OF THIS GAME IS CRYSTAL CLEAR. DEATH OF JAMES BOND!
Brand
IAN FLEMING
Birth Date : 28/05/1908
इयान फ्लेमिंग यांचा जन्म २८ मे, १९०८ रोजी लंडनमधील ग्रीन स्ट्रीट येथे झाला. त्यांचे शिक्षण इटन महाविद्यालायात झाले. उच्चशिक्षणासाठी ते जर्मनी आणि ऑस्ट्रिया येथे गेले. सुरुवातीचा काही काळ रायटर्स न्यूज एजन्सी येथे काम केल्यावर ते शेअर मार्केटमध्ये स्टॉकब्रोकर म्हणून काम करू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पूर्ण वेळ नौदलातील हेरखात्यात असिस्टंट डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते. महायुद्धाच्या नंतर इयान फ्लेमिंग यांनी केम्स्ले , संडे टाइम्स या आणि इतर काही वर्तमानपत्रांसाठी परराष्ट्रीय बातमीदार म्हणून काम केले. १९५२ साली त्यांनी कसिनो रॉयल ही थरारक कादंबरी लिहिली. याच कादंबरीतून त्यांनी जेम्स बाँड – एजंट ००७ हे पात्र जगासमोर आणले. पुढील आयुष्यात त्यांनी जेम्स बाँड या पात्राभोवती गुंफलेल्या तेरा कादंबऱ्या लिहिल्या. या सर्व कादंबऱ्या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. या कादंबऱ्यावर चित्रपटही निघाले. १९६२ साली हृदयविकाराशी झगडता झगडता त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी – वॅÂस्परसाठी – एका उडणाऱ्या गाडीवर आधारित चिटी चिटी-बँग बँग ही कथा लिहिली. १२ ऑगस्ट, १९६४ साली केंट येथे त्यांचा मृत्यू झाला.
Reviews
There are no reviews yet.