FAR FAR VARSHAPURVI – फार फार वर्षांपूर्वी
₹160.00
Product Highlights
भारतासारख्या फार पूर्वीपासून मानवी संस्कृती नांदत असलेल्या देशात पुरातत्व आणि मानव शास्त्रांकडे आपलं खरं तर दुर्लक्षच होतं. दुसरं म्हणजे बरेचदा आख्यायिकांवर आपण जास्त विश्वास ठेवतो आणि ऐतिहासिक सत्य नाकारतो. ऐतिहासिक व्याक्तिना देवत्त्व बहाल करताना ती ही माणसंच असतात हेही आपण विसरतो. प्राचीन मानवाची प्रगती माहीत करून घेण्याच्या ह्या शास्त्रांची तोंडओळखसुद्धा शालेय अभ्यासक्रमात करून दिली जात नाही; ही एक दुर्दैवी घटना आहे.
Description
LONG LONG AGO, IS THE USUAL START OF MANY FAIRY TALES; BUT THIS BOOK DOES NOT CONTAIN FAIRY TALES. IT TELLS US ABOUT WHAT HAPPENED IN THE PAST OF THE EARTH AS WELL AS HUMANS. IN VERY SIMPLE LANGUAGE IT ALSO TELLS US HOW MYSTERIES OF PALEONTOLOGY AND ARCHAEOLOGY ARE UNRAVELED BY SCIENTIFIC METHODS. IT IS ALSO A STORY OF HUMAN CULTURE. IT REFLECTS ON THE EARLY. AGRICULTURE, HOW HUMAN EVOLUTION WAS CONTROLLED BY ENVIRONMENTAL FACTORS, WHAT SAND TELLS US ABOUT OUR PAST, HOW PALEONTOLOGISTS DECIPHER SMALL CLUES AND COME TO THEIR CONCLUSIONS ABOUT FOSSIL ANIMALS AND HOW THESE ANIMALS LIVED, HOW MAN REACHED THE AMERICAS, HOW HE SPREAD OVER ASIA. IT GIVES INFORMATION ABOUT INDIANS AND THEIR SEAFARING WAYS. MANY THINGS ARE REALESED TO READERS IN SIMPLE, CLEAR AND EASILY UNDERSTANDABLE LANGUAGE IN A PRECISE MANNER.
Brand
NIRANJAN GHATE
Birth Date : 10/01/1946
निरंजन घाटे आणि विज्ञानविषयक भरपूर आणि सोपी माहिती असणारी पुस्तके हे समीकरण वाचकांच्या मनात पक्के झाले आहे. निरंजन घाटे यांनी पुणे विद्यापीठातून भूशास्त्र विभागात उच्च शिक्षण घेतले. १९६८ ते १९७७ या काळात त्यांनी पुणे विद्यापीठात प्रयोगदर्शक आणि व्याख्याता म्हणून काम केले आहे. नोव्हेंबर १९७७ पासून जवळजवळ सहा वर्षे त्यांनी आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून कार्यक्रम अधिकारी या नात्याने सहाशे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे ते उपसंचालक व नंतर संचालक होते. आता ते पूर्ण वेळ लेखन करतात. सृष्टिज्ञान, बुवा, ज्ञानविकास, किर्लोस्कर यांसारख्या मासिकांचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, मराठी साहित्य परिषद आणि महात्मा फुले वस्तू संग्रहालय यांचे ते आजीव सदस्य आहेत. मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९८५ साली त्यांना उत्कृष्ट विज्ञान प्रसारक म्हणून मानपत्र मिळाले. त्यांनी लिहिलेल्या वसुंधरा, एकविसावं शतक आणि नवे शतक या पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे प्रा.डॉ.मो.वा. चिपळूणकर पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. याशिवाय बालसाहित्य, विज्ञान साहित्य या विभागांत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेले सुमारे ३००० लेख आणि ३०० कथा विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. मराठी व्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदी नियतकालिकांमधूनही त्यांनी लेखन केले आहे. मराठी विज्ञानसाहित्याचा इतिहास या विषयातील पथदर्शक तज्ज्ञ म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार
Reviews
There are no reviews yet.