EKONISAVI JAT – एकोणिसावी जात
₹160.00
Product Highlights
ग्रामीण कथा व कांदबरीकार श्री. महादेव मोरे यांची ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली ग्रामीण कादंबरी.अठरापगड जातींच्या पंक्तीत “मोटार लायनी”तल्या माणसांची आगळी एकोणिसावी जात बसवून, लेखकानं एक वेगळंच जग साNया तपशिलांनिशी वाचकांसमोर उभं केलं आहे. मुळात हे धगधगीत जीवनानुभवांचं चित्रण आहे.अनुभव घेण्यातील उस्पूÂर्तपणा, रोमॅन्टिक वृत्ती, अभिव्यक्तीतील ताजेपणा आणि अत्यंत ओघवती, चित्रदर्शी शैली यांमुळे या कादंबरीतील वास्तव काळजाला भिडतं ….
Description
THE NOVEL OF MAHADEV MORE, WHO IS WRITING ON THE KARNATAKA BORDER OF HIS STATE, IS LITERALLY RUNNING A FLOUR MILL, AND LOOKING AT THE SOCIETY WITH A FINE LOOK. THE NOVEL HAS EVEN GOT A `RIGHT SIGN` IN THAT IT SEEMS THAT SOME OF THESE WORKS HAVE BEEN DONE IN SOME OR THE OTHER WAY, AND WHETHER THERE IS ANY WORK DONE OR NOT, IT SHOULD HAVE BEEN CAREFULLY PREPARED BY THE `BUSINESS`. SINCE THIS WRITING WAS ALMOST 40 YEARS AGO, THERE IS A POSSIBILITY THAT THERE HAS BEEN SOME CHANGE IN THE DETAILS OF THIS CASE. HOWEVER, IT IS VERY SIMILAR TO OURS THAT WE HAVE NOT CHANGED A LOT IN THE EMOTION OF LANGUAGE. THE NOVEL `CHANAKSHA`, LIKE `NARENDRA CHAPALGAONKAR` HAS SURVIVED TWENTY-TWO TIMES A NOVEL. EVERYTHING CAME INTO THIS.
Brand
MAHADEO MORE
Birth Date : 22/06/1939
महादेव मोरे यांचा जन्म बेळगाव येथील निपाणी येथे झाला. त्यांचे एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढे इंटर आर्ट्सचे शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूरला दाखल झाले, मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना १९५९ साली कॉलेज शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी घर चालवण्यासाठी अनेक अंगमेहनतीची कामेही केली. मात्र एकीकडे त्यांचे लिखाणही चालूच होते. यादरम्यान त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, प्रासंगिक लेख, दैनिकांच्या पुरवण्यांमधून सदर लेखन, समीक्षा लेखन असे विविधस्वरूपाचे लेखन केले. त्यांची पहिली कथा २२ ऑक्टोबर, १९५९ साली साप्ताहिक स्वराज्यमध्ये प्रकाशित झाली. नवयुग, किर्लोस्कर, गावकरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध कथास्पर्धांमध्येही त्यांच्या कथांना पारितोषिके मिळाली. आजवर त्यांचे १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या आणि ललित गद्य असे साहित्य प्रकाशित झाले आहे. चिताक या त्यांच्या कथासंग्रहास १९७५-७६ सालचा व चेहऱ्यामागचे चेहरे या संग्रहास राज्य पुरस्कार मिळाला. तसेच २००७ साली महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. झोंबड या त्यांच्या कादंबरीस १९९० सालातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी म्हणून दोन पारितोषिकेही मिळाली. त्यांची थ्रील्स, बेंडल, तिंगाड आदी पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.

Reviews
There are no reviews yet.