EK SANGU – एक सांगू
₹250.00
Product Highlights
समर्पक शब्दांत दोन्ही बाजू प्रभावीपणे मांडणारं हे मंजिरी गोखले जोशी यांचं पुस्तक समयोचितदेखील आहे. अभिनेत्री सुश्मिता सेन यांनी प्रास्ताविकात वडील पिढीच्या डोळेझाकीला जमिनीत तोंड खुपसून बसणाNया शहामृगी वृत्तीची उपमा दिली आहे. असहायतेतून आलेली ही शहामृगी वृत्ती कमी करायला हे पुस्तक एखाद्या वाटाड्याप्रमाणे दिशादर्शन करू शकेल, असा मला विश्वास वाटतो. – अरुण टिकेकर संपादक, लेखक यश-अपयश, जराशी मजा आणि मद्यपान करून गाडी चालवणं, निरुपद्रवी शॉर्टकट्स आणि फसवणूक… या साNयातील सीमारेषा किती पुसट असते नाही! स्वप्नांनी भरलेलं भविष्य आणि आवेशपूर्ण तरुण मन, संताप, पळून जाणं, मादक द्रव्यांचं सेवन आणि हिंसाचाराकडे किती चटकन वळतं! आपण मुलांशी फक्त बोललो असतो आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे फक्त त्यांचं ऐवूÂन घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं टीनएजर्सच्या पालकांना कितीदा वाटलं असेल? सगळ्या आईबाबांना आपल्या मुलांना जे सांगावंसं वाटत असतं तेच या पुस्तकात अतिशय खुसखुशीत शैलीत सांगण्यात आलं आहे. – किरण बेदी माजी आयपीएस अधिकारी ही मुलं सोलापूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड अशा विभिन्न वातावरणात वाढली असूनसुद्धा त्यांची मते फारशी वेगळी नाहीत! हा आगळा उपक्रम आता मराठी वाचकापर्यंत पोचत आहे, ह्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. – दिनकर रायकर संपादक, लोकमत मनात उभारणारी प्रेमभावना, उच्चशिक्षण, व्यवसायाची निवड आणि हाती सतत बाळगलेला सेल फोन! मुलांवर तणाव असतो परीक्षेचा, इतर मुलांसारखं ‘वूÂल’ दिसण्याचा आणि पालकांच्या अपेक्षांचा. असे अनेक प्रश्न कौशल्याने हाताळणारं हे पुस्तक किशोर व युवा अवस्थेत असलेल्या प्रत्येकाने जरूर वाचावं, आणि त्यांचा हा प्रवास कौतुकाने पाहणाNयांनीसुद्धा! – गिरीश कुबेर संपादक, लोकसत्ता
Description
BLUE DENIM, SNAZZY SUNGLASSES, AN EVOLVING LINGO, FRENETIC TEXT MESSAGING AND HOURLY SOCIAL NETWORK UPDATES…THE PLEASURE OF CELEBRATING YOUTH BRINGS THE PRESSURES OF EXAMS, FOREGOING DREAMS FOR SENSIBLE CAREERS, PEER AND PARENTAL EXPECTATION AND STILL LOOKING COOL! AND FOR THE PARENTS OF TEENAGERS IS THE UNCERTAINLY-ARE YOU “GIVING SPACE” OR BEING CARELESS, IMPARTING VALUES OR BEING DICTATORIAL, ENCOURAGING AMBITION OR BUILDING BURDENSOME EXPECTATION? THERE IS SO MUCH TO TALK ABOUT -A FOR ALCOHOL, APPEARANCE,AMBITION, B FOR BABIES, BRACES, BOYFRIENDS, D FOR DADS, DREAMS AND DRUGS, E FOR EMBARRASSMENT, G FOR GROWING UP, GENDER DIVIDE, GIRLFRIENDS, J FOR JEALOUSY, P FOR PIMPLES, M FOR MUMS, MEN , R FOR RUNNING AWAY, S FOR SUICIDE, T FOR TEACHERS, V FOR VALENTINE\`S… THE BOOK CAPTURES THE NUANCES OF PARENT -TEENAGER COMMUNICATION IN A SERIES OF SNAPPY CONVERSATIONS. A PERFECT GIFT FOR ANYONE GROWING UP… AND FOR ANYONE STANDING BY TO WATCH!
Brand
MANJIREE GOKHALE JOSHI
मूळच्या पुण्याच्या असलेल्या मंजिरी, सध्या लंडनमधील ‘प्राइमल पिक्चर्स इन्फोर्मा बिझनेस इन्फॉर्मेशन’मध्ये प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्या ‘माया केअर’ या वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या ना-नफा तत्त्वावरील संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. त्यांनी ‘द इंडियन एक्स्पे्रेस’मध्ये वार्ताहर म्हणून, ‘डाटाक्वेस्ट’ मासिकाच्या साहाय्यक संपादिका म्हणून, ‘इन मुंबई टेलिव्हिजन’मध्ये कार्यक्रम संचालक म्हणून काम केले आहे. याशिवाय ‘झेंसार टेक्नॉलॉजीज्’च्या बीपीओ विभागाच्या मनुष्यबळ विभाग प्रमुख, तसेच ‘कॉन्टॅक्ट सेन्टर प्रमुख’ म्हणून आणि ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुअरन्स’मध्ये राष्ट्रीय व्यवस्थापक, मार्केटिंग म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना ब्रिटिश उच्चायुक्तांची ‘शेवेनिंग शिष्यवृत्ती’ मिळाली असून, २००६ साली यूकेमध्ये आयोजित केलेल्या ‘लीडरशीप अॅन्ड मॅनेजमेंट’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निवडण्यात आलेल्या १२ भारतीय व्यावसायिकांमध्ये – ‘प्रोफेशनल्स’मध्ये त्यांचा समावेश होता. त्या सध्या सैद बिझनेस स्कूल, ऑक्स्फर्ड विद्यापीठ येथे विशाल प्रकल्प व्यवस्थापनाच्या मास्टर्स पदवीचे शिक्षण घेत आहेत. मंजिरी गोखले जोशी यांचे पहिले पुस्तक ‘इन्स्पायर्ड’ २००६ साली प्रकाशित झाले. (सहलेखक – डॉ. गणेश नटराजन) दुसरे पुस्तक ‘क्रशेस, करिअर्स अॅन्ड सेलफोन्स’ २०११ साली प्रकाशित झाले आहे, तर तिसरे पुस्तक ‘बॉसेस ऑफ द वाइल्ड’ ‘मॅकग्रॉ हिल एज्यूकेशन’, दिल्लीतर्फे २०१३ साली प्रकाशित झाले. मंजिरी व त्यांचे पती अभय जोशी, मिल्टन कीन्स, यूकेमध्ये राहतात. तन्वी व मही या त्यांच्या दोन मुली आहेत.
Reviews
There are no reviews yet.