DNYANDEEP – ज्ञानदीप
₹150.00
Product Highlights
मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंग्रजीत `टेल मी व्हाय’ नावाच्या पुस्तकांची एक मालिका आहे. त्यावरूनच हे पुस्तक लिहिण्याची स्फुर्ती झाली. मात्र शक्य तिथे भारतीय संदर्भ वापरायचे हेही ठरले. पुस्तकास अनुक्रमणिका नाही. कुठेही उघडून वाचावे, अशीच अपेक्षा आहे. मराठीत अशी पुस्तके फार कमी आहेत. त्यात भर टाकायचा हा एक प्रयत्न.
Description
DNYANDEEP MEANS LIGHT OF KNOWLEDGE. THIS BOOK IS MEANT FOR STUDENTS AS WELL AS THEIR PARENTS. STUDENTS ARE NATURALLY INQUISITIVE. THEY ASK MANY QUESTIONS, ESPECIALLY THOSE RELATED TO SCIENCE, WHEN THEY ARE EXPOSED TO SCIENCE IN SCHOOL. THEY QUESTION THEIR TEACHERS AND ALSO THEIR PARENTS. TEACHERS ARE NOT AVAILABLE ALL THE TIME. SO, NEXT OPTION IS THEIR PARENTS; WHO SOME TIMES ARE STUMPED BY SOME QUESTIONS. THIS BOOK CATERS TO MANY QUESTIONS COMMONLY ASKED BY STUDENTS; LIKE WHAT ARE COMETS, WHERE DO THEY COME FROM AND MANY SUCH COMMONLY ASKED ASTRONOMICAL QUESTIONS. SIMILARLY, THE BOOK DWELLS INTO THE OTHER BRANCHES OF SCIENCE LIKE BIOLOGY, PHYSIOLOGY, A LITTLE BIT OF CHEMISTRY ETC. MORE THAN HUNDRED AND FIFTY QUESTIONS ARE ANSWERED IN A VERY SIMPLE, EASILY UNDERSTANDABLE LANGUAGE IN THIS BOOK. IF KEPT HANDY IT IS EQUALLY USEFUL TO STUDENTS, PARENTS AND TEACHERS.
Brand
NIRANJAN GHATE
Birth Date : 10/01/1946
निरंजन घाटे आणि विज्ञानविषयक भरपूर आणि सोपी माहिती असणारी पुस्तके हे समीकरण वाचकांच्या मनात पक्के झाले आहे. निरंजन घाटे यांनी पुणे विद्यापीठातून भूशास्त्र विभागात उच्च शिक्षण घेतले. १९६८ ते १९७७ या काळात त्यांनी पुणे विद्यापीठात प्रयोगदर्शक आणि व्याख्याता म्हणून काम केले आहे. नोव्हेंबर १९७७ पासून जवळजवळ सहा वर्षे त्यांनी आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून कार्यक्रम अधिकारी या नात्याने सहाशे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे ते उपसंचालक व नंतर संचालक होते. आता ते पूर्ण वेळ लेखन करतात. सृष्टिज्ञान, बुवा, ज्ञानविकास, किर्लोस्कर यांसारख्या मासिकांचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, मराठी साहित्य परिषद आणि महात्मा फुले वस्तू संग्रहालय यांचे ते आजीव सदस्य आहेत. मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९८५ साली त्यांना उत्कृष्ट विज्ञान प्रसारक म्हणून मानपत्र मिळाले. त्यांनी लिहिलेल्या वसुंधरा, एकविसावं शतक आणि नवे शतक या पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे प्रा.डॉ.मो.वा. चिपळूणकर पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. याशिवाय बालसाहित्य, विज्ञान साहित्य या विभागांत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेले सुमारे ३००० लेख आणि ३०० कथा विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. मराठी व्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदी नियतकालिकांमधूनही त्यांनी लेखन केले आहे. मराठी विज्ञानसाहित्याचा इतिहास या विषयातील पथदर्शक तज्ज्ञ म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार
Reviews
There are no reviews yet.