DISCLOSURE – डिस्क्लोजर
₹450.00
Product Highlights
‘डिस्क्लोजर’ ही मायकेल क्रिश्टनची नवी कादंबरी. या कादंबरीतून त्यानं माणूस नावाच्या प्राण्याच्या अथांग भावविश्वाचा वेध घेतला आहे. ‘डिजिकॉम’ ही एक कॉम्प्युटर कंपनी… गळेकापू औद्योगिक स्पर्धेत जिवाच्या करारानं धावणारी… टॉम सँडर्स या गुणी अधिकाऱ्यायाला डावलून, या कंपनीच्या सर्वोच्च पदावर विराजमान होते सौंदर्यवती मेरेडिथ जॉन्सन… विशेष म्हणजे, हे दोघेही कधीकाळी परस्परांच्या प्रेमपाशात गुंतलेले असतात. आणि तरीही अचानक मेरेडिथ, सँडर्सनं आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप ठेवते… भूत आणि वर्तमानाच्या सीमारेषा अकस्मात अलगद एकमेकींत मिसळू लागतात… या आरोपाच्या सावटातून निसटण्याचा सँडर्स आटोकाट प्रयत्न करू लागतो. आणि एक मानसनाट्य आकार घेऊ लागतं… स्त्री-पुरुष संबंधांतल्या चकव्यांमधून निर्माण होणारं आणि औद्योगिक शर्यतींमधूनही… मुखवटे गळून पडू लागतात, आधुनिक जगाची एक क्रूर बाजू उघडी पडू लागते… गतिमान काळाच्या झंझावाती प्रवाहात वेगानं बदलत चाललेल्या स्त्री-पुरुषांमधल्या नात्यांची अत्याधुनिक कहाणी… ‘डिस्क्लोजर!’
Description
THE THRILLER THAT OPENED A NEW CHAPTER IN THE SEX WARS … THOMAS SANDERS` WORLD COLLAPSES IN JUST 24 HOURS – HE IS PASSED OVER FOR PROMOTION, HIS NEW WOMAN BOSS COMES ON TO HIM DURING A DRINK AFTER WORK, THEN, THE NEXT MORNING, HE LEARNS THAT SHE HAS ACCUSED HIM OF SEXUALLY HARASSING HER. SHE DEMANDS HIS TRANSFER, THEREBY THREATENING TO CUT HIM OFF FROM THE MILLIONS HE WOULD HAVE MADE WHEN HIS HIGH-TECH COMPANY WAS FLOATED ON THE STOCK MARKET. WHAT FOLLOW NEXT MADE DISCLOSURE THE MOST TALKED ABOUT NOVEL OF THE DECADE
Brand
MICHAEL CRICHTON
Birth Date : 23/10/1942
Death Date : 04/11/2008
मायकेल क्रायटन यांची वीस कोटींपेक्षा जास्त पुस्तके खपली असून त्यांच्या पुस्तकांचे जगभरात ३६ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या १३ पुस्तकांवर चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या द अन्ड्रोमिडा स्ट्रेन, ज्युरासिक पार्क, नेक्स्ट, टाइम लाइन, डिस्क्लोजर, प्रे, स्टेट ऑफ फिअर आणि पायरेट लॅटिट्यूड्स या कादंबऱ्यांनी लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले आहेत. एकाच वेळी पुस्तक, चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रम हे सर्वोच्च स्थानी असण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सन २००८ मध्ये मायकेल क्रायटन यांचा मृत्यू झाला, त्यावेळी मायक्रो ही कादंबरी जवळजवळ पूर्ण झाली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ती रिचर्ड प्रेस्टन यांनी पूर्ण केली. विज्ञानावर आधारलेल्या थरारक व रहस्यमय कथानकांनी वाचकांना खिळवून टाकणाऱ्या मायकेल क्रायटन यांना अफाट लोकप्रियता लाभली. हार्वर्ड विद्यापीठातून एम.डी. पदवी घेतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. जॉन लांग आणि मायकेल डग्लस या टोपणनावांनी दहा कादंबऱ्या लिहिल्यानंतर १९६९मध्ये आलेली द अन्ड्रोमीडा स्ट्रेन ही पहिलीच कादंबरी खळबळजनक ठरली.
Reviews
There are no reviews yet.