DIE FOR ME – डाय फॉर मी
₹500.00
Product Highlights
फिलाडेल्फियाच्या एका बर्फाच्छादित शेतात एक मृतदेह व्हिटो चिकोटेलीला सापडतो, तेव्हा आणखी काही मृतदेह आसपास असतील, असं त्याला जाणवतं. वैद्यकीय परीक्षक कॅथरिन त्याला सोफी जोहान्सन या पुरातत्त्व संशोधकाची मदत या कामात घेण्याचं सुचवते. सोफी आपल्या जी. पी. आर.च्या साहाय्यानं तिथे शोध घेऊ लागते, तेव्हा एक-दोन नाही, तर कितीतरी प्रेतं तिला स्क्रीनवर दिसतात आणि शिवाय अनेक रिकामे खड्डे! … तो अनेक नावांनी वावरतो. तो ओ-आर-ओ या कंपनीसाठी काम करतो आणि ती कंपनी व्हिडिओ गेम्स तयार करते. फ्रेझिअर लुईला मध्ययुगीन काळातल्याप्रमाणे यातना देणाऱ्या साधनांचा उपयोग चित्रिकरणासाठी करायचा असतो आणि त्यासाठी त्याला सोफी हवी असते!
Description
A KILLER WITH A PASSION FOR THE PAST, HIS VICTIMS TORTURED BEYOND ENDURANCE, ALL DONE IN THE NAME OF A GAME…DIE FOR ME IS KAREN ROSE AT HER MOST CHILLING BEST. IF YOU LOVE THIS BE SURE TO CHECK OUT THE SEQUELS TO KAREN`S MINI-TRILOGY, SCREAM FOR ME AND KILL FOR ME. BUT PLAYING GAMES WILL KILL YOU… WHEN A MULTIMEDIA GAMES DESIGNER DECIDES TO TAKE HIS RESEARCH TO THE NEXT LEVEL FOR HIS NEW GAME, FANTASY ENDS AND MURDER BEGINS. HOMICIDE DETECTIVE VITO CICCOTELLI IS EXPECTING THE WORST. CALLED TO A REMOTE MURDER SITE, HE IS CONFRONTED WITH NUMEROUS BODIES, ALL WITH HORRIFIC INJURIES, ALL IT SEEMS THE VICTIM OF THE SAME KILLER. WHEN THE MEDICAL EXAMINER REVEALS THAT THE WOUNDS ARE CONSISTENT WITH INSTRUMENTS OF MEDIEVAL TORTURE, CICCOTELLI TURNS TO SOPHIE JOHANNSEN, MUSEUM CURATOR AND SPECIALIST IN MEDIEVAL WARFARE, TO LEARN MORE ABOUT THE KILLER`S METHODS AND TO TRY AND FIND THE KILLER BEFORE HE SPIRALS OUT OF CONTROL…
Brand
KAREN ROSE
Birth Date : 29/07/1964
जगभरातील वाचकांच्या पसंतीस उतरलेली व रिटा या सन्माननीय पारितोषिकाची विजेती करेन रोझ हिचा जन्म, बालपण व शिक्षण वॉशिंग्टन डी.सी. नजीकच्या मेरीलँड या शहरात झाले. जुलै, २००३ मध्ये डोंट टेल मी ही तिची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर आतापर्यंत तिची एक दीर्घकथा व दहा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आय अॅम वॉचिंग यू या तिच्या तिसऱ्या कादंबरीसाठी तिला २००५ सालाचे सर्वोत्कृष्ट रहस्यमय लेखीकेचे रिटा पारितोषिक मिळाले. कोणत्याही कथेचा शेवट हा नेहमी सुखद असावा असे माझे मत आहे. करेन म्हणते, आणि मला वाटते की वाचकांनाही असाच शेवट आवडतो. खऱ्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात की जगणे मुश्किल होऊन जाते. अशा वेळेस वाटते की हळुच अशा एका प्रदेशात निघून जावे की जिथे अखेरच्या वळणावर गुलाबांचे ताटवे पसरलेले असतील. मला आशा आहे की माझ्या कथा, माझ्या वाचकांनाही अशीच एक हवीहवीशी वाटणारी सुरेख वाट मिळवून देतील.
Reviews
There are no reviews yet.