DHARMANMADHIL BANDHUTVACHYA MARGAVAR – धर्मांमधील बंधुत्वाच्या मार्गावर
₹240.00
Product Highlights
जगभर धार्मिक हिंसेच्या वाढत्या घटनांकडे पाहता धर्माधर्मांमधील संवाद काळाची गरज बनला आहे. परमपूज्य बौध्द धर्मगुरू दलाई लामा अशा धर्मांतर्गत संवादासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. धर्मांमधील बंधुत्वाची गरज अधोरेखित करताना ते सर्वधर्मीय शिकवणींचा समग्र मागोवा घेतात. या त्यांच्या चिंतनात्मक पुस्तकात सर्व धर्मांमधील एकसूत्रता आणि सहिष्णुतेची शिकवण अधोरेखित होते.
Description
IN TOWARD A TRUE KINSHIP OF FAITHS, THE DALAI LAMA ALSO EXPLORES WHERE DIFFERENCES BETWEEN RELIGIONS CAN BE GENUINELY APPRECIATED INSTEAD OF BECOMING SOURCES OF CONFLICT. CREATING GENUINE HARMONY DOES NOT DEPEND ON ACCEPTING THAT ALL RELIGIONS ARE FUNDAMENTALLY THE SAME OR THAT THEY LEAD TO THE SAME PLACE. MANY FEAR THAT RECOGNIZING THE VALUE OF ANOTHER FAITH IS INCOMPATIBLE WITH HAVING DEVOTION TO THE TRUTH OF ONE’S OWN. NEVERTHELESS, THE DALAI LAMA SHOWS HOW A SINCERE BELIEVER CAN, WITH INTEGRITY, BE A PLURALIST IN RELATION TO OTHER RELIGIONS WITHOUT COMPROMISING COMMITMENT TO THE ESSENCE OF THE DOCTRINAL TEACHINGS OF THEIR OWN FAITH. AN ISSUE OF CENTRAL IMPORTANCE FOR THE DALAI LAMA PERSONALLY AND FOR THE ENTIRE WORLD IN GENERAL, TOWARD A TRUE KINSHIP OF FAITHS OFFERS A HOPEFUL YET REALISTIC LOOK AT HOW HUMANITY MUST STEP INTO THE FUTURE.
Brand
HIS HOLINESS DALAI LAMA
Birth Date : 06/07/1935
हे १४वे व विद्यमान दलाई लामा आहेत. तिबेटी बौद्ध मतातील गेलुग्पा पंथाच्या प्रमुख आचार्यांना दलाई लामा अशा संज्ञेने उल्लेखले जाते. १७ नोव्हेंबर, इ.स. १९५० रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. चौदाव्या दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले आहे. दलाई लामा तिबेट मुक्तीसाठी विविध शांतताप्रिय मार्गानी झगडत आहेत, आंदोलने करीत आहेत व आपल्यावरील अन्यायाची गाथा जगासमोर हिरिरीनं मांडीत आहेत. जागतिक स्तरावर तिबेटची बाजू मांडण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. याच कारणासाठी दलाई लामांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना इ.स. १९८९ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. देश-विदेशात धर्म, तत्वज्ञान, अहिंसा, जागतिक शांतता, करूणा, मानवी हक्क इत्यादी विषयांवर ते व्याख्याने देत आहेत. देश-विदेशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननिय मानद पदवी देऊन गौरविले आहे. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना मानचिन्हे व गौरवपत्रे दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी जगभरातील ६२ देशांना भेटी दिल्या असून ७२पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी ‘फ्रिडम इन एक्साईल’ व ‘माय लँड एँण्ड माय पीपल’ ही दोन त्यांची आत्मचरित्रपर पुस्तके आहेत.
Reviews
There are no reviews yet.