DHANVANTARI GHAROGHARI – धन्वंतरी घरोघरी
₹180.00
Product Highlights
`फॅमिली डॉक्टर’, ही संकल्पना काळानुरूप बदलली असली, तरी स्त्री-पुुरुष, आबाल-वृद्ध अशा आपल्या सर्वांनाच आरोग्य विषयक समस्यांसाठी डॉक्टरांची आवश्यकता असते. बालकाच्या विकास-वाढीचा प्रश्न असो, नाक-कान-घसा यांचे विकार असोत. दात, डोळ्यांचे आजार असोत, अथवा आधुनिक सौंदर्यशास्त्र असो, भीतीसारखे मानसिक आजार असोत, अस्थिरोगासारखी जटील समस्या असो. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या असोत, अथवा वैवाहिक समस्या असोत… अर्थात गंभीर समस्या असोत वा किरकोळ आजार, त्याचे वेळीच निराकरण करण्यासाठी मान्यवर डॉक्टरांनी केलेले बहुमोल मार्गदर्शन; थोडक्यात `पॅÂमिली डॉक्टर’ ही संकल्पना अधोरेखित करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच… धन्वंतरी घरोघरी!
Description
FAMILY DOCTOR’, A CONCEPT THOUGH NOT TOTALLY FORGOTTEN BUT MODIFIED IN TODAY’S WORLD, YET PRESENCE OF A DOCTOR IS VERY ESSENTIAL. MALE OR FEMALE, CHILD OR AGED, EACH ONE REQUIRES TO SEE A DOCTOR, A SPECIALIST, A SUPER SPECIALIST EVERY NOW AND THEN. THERE THOUSANDS OF QUERIES THAT WE WANT TO ASK A DOCTOR ABOUT. AT TIMES, ISSUES RELATED WITH THE HEALTH OF INFANTS, THEIR DEVELOPMENT AND GROWTH, OR PROBLEMS RELATED WITH ENT THAT IS EAR, NOSE AND THROAT, DENTAL PROBLEMS OR ISSUES RELATED WITH EYES. THE PROBLEMS MAY BE RELATED TO EXTERNAL BEAUTY OR INTERNAL BEAUTY THAT IS PSYCHOLOGICAL. AT TIMES, THE PROBLEMS ARE AS SEVERE AS OSTEOPOROSIS. GYNAECOLOGICAL OR COUNSELLING AFTER MARRIED LIFE IS YET ANOTHER ASPECT OF THESE PROBLEMS. IT IS NOT THAT ONLY SEVERE PROBLEMS NEED ATTENTION. MINUTE THINGS LIKE RECURRING FEVER, INFECTION, COUGH AND COLD ETC. ALSO NEED MEDICAL ADVICE. IT IS OUR FAMILY DOCTOR WHO LOOKS INTO ALL THESE MATTERS AND GUIDES US FOR OUR WELL BEING. THIS PRESENT BOOK IS AN ATTEMPT TO HIGHLIGHT THE CONCEPT OF ‘FAMILY DOCTOR’.
Brand
ANIL GANDHI
डॉ. अनिल गांधी यांचा जन्म १९३९ मध्ये माढा (सोलापूर) येथे झाला. त्यांनी १९६३ला एम.बी.बी.एस. झाल्यानंतर पुण्यामध्ये फॅमिली फिजिशियन म्हणून पाच वर्षें प्रॅक्टिस केली. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरला. १९७१ला ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलमधून एम.एस. झाले. याच काळात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पेशंट्सवर उपचार करण्यासाठी त्यांना औषधांपासून ऑपरेशनपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ते १९६६ ते ८६ अशी वीस वर्षे खेड्यापाड्यांमध्ये जात होते. १९७०ला गांधी हॉस्पिटल सुरू झाले. तिथपासून आजपर्यंत त्यांनी हजारो ऑपरेशन्स केली; त्याद्वारे एक कुशल सर्जनअशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सेंट माक्र्स हॉस्पिटल, लंडन येथून १९७४ ला कोलोरेक्टल सर्जरीमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केले. नंतर १९८४ पर्यंत परदेशात अनेक ठिकाणी त्यांनी शोधनिबंध सादर केले. बी.जे. मेडिकल कॉलेज, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, धोंडूमामा साठे होमिओपॅथी कॉलेज येथे मानद प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. याचबरोबर सामाजिक कार्याच्या तळमळीतून त्यांनी लोणावळ्याजवळील पांगळोली या आदिवासी वस्तीत आरोग्य, शिक्षण व विकासकार्य सुरू केले. पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय एकात्मता अभियानात त्यांचा मनापासून सहभाग होता. २०११मध्ये पुणे व वाई येथील वसंत व्याख्यानमालेत व्याख्याने. मना सर्जना या आत्मकथनपर लेखनाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद. दै. महाराष्ट्र टाइम्सच्या सगुण-निर्गुण या सदरात लेखमाला प्रसिद्ध. तसेच सकाळ, साप्ताहिक सकाळ आणि लोकसत्ता यातून विविध लेख. मनासर्जना (आत्मवृत्त) या पुस्तकाला बडोदा साहित्य परिषदेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाले. या पुस्तकाचे गुजराथी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवाद झाले. धन्वंतरी घरोघरी, विचारी मना, शोध मनाचा, संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची या पुस्तकाचा उल्लेखनीय पुस्तक म्हणून विज्ञान परिषद मुंबईने गौरविले. या कातरवेळी – आनंदी वृद्धत्वाकडे वाटचाल आणि त्याचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर एकाचवेळी प्रसिद्ध झाले. कालनिर्णय आरोग्य २०१७ मध्ये संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची प्रदिर्घ लेख छापून आला आहे.
Reviews
There are no reviews yet.