Devgandharva – देवगंधर्व
₹250.00
Product Highlights
भास्कररावांच्या ऐन उमेदीत, निरनिराळ्या प्रसिध्द घराण्यातील अनेक गवई उत्तरेकडून दक्षिणेस आले होते. त्या प्रत्येकामध्ये काही विशेष गुण होते यात संशय नाही. कोणामध्ये तानेची, कल्पनातीत तयारी, कोणामध्ये गळ्याची मनस्वी माधुरी, कोणामध्ये आलापाचे सौंदर्य, तर कोणामध्ये तालाचा अजस्त्र खटाटोप दिसून येई. परंतु स्वराचा जिवंतपणा, रागाचा सच्चेपणा व तालाचे लालित्य हे तिन्ही गुण सारख्या उत्कर्षाला पोहोचलेले गुरूवर्य भास्कररावांप्रमाणे क्वचित् कोणा गायकाच्या अंगी दिसून येत असत. सबंध शतकात असा एकच पुरूष निर्माण होतो असे त्यांच्याविषयी कोणाही म्हणावे एवढी त्यांची थोरवी होती. गोविंदराव टेंबे पंजाबात अजूनही ऐकायला मिळतं की, “ भास्करबुवांचं गाणं झालं की असं वाटायचं
की, दुसरं गाणं ऐकू नये, हेच ऐकावं.” हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटण्यासारखं आहे…. त्यांनी रंगभूमीच्या माध्यामातून शास्त्रोक्त संगीताचा खूप प्रचार केला. अजूनही पुष्कळ लोकांना यमन राग ओळखता येत नाही. पण यमन म्हटलं की हे ‘नाथ हा माझा’ सारखं आहे, हे त्यांना ओळखता येतं. पं.भीमसेन जोशी अशी ही देवगंधर्वांची चरित्र मैफल.
Reviews
There are no reviews yet.