DADLELA ITIHAS – दडलेला इतिहास
₹650.00
Product Highlights
‘दडलेला इतिहास’ (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा व्यक्तींनी अगदी गुप्तपणे एक कंपू करून हेतुत: सिक्रेट सोसायटीची स्थापना केली व त्याद्वारेच मानवतेविरुद्ध घडवून आणलेला अतिशय क्रूर पाशवी गुन्हा म्हणजे पहिले महायुद्ध. जगापासून आपली गुन्हेगारी लपवून ठेवण्यासाठी या लोकांनी जाणूनबुजून युद्धाच्या उगमांची खोटी व दिशाभूल करणारी कारणे कशी तयार केली व ती खोट्या इतिहासाद्वारे जगासमोर कशी मांडली हे या पुस्तकाने उघड करून दाखविले आहे. (हाच खोटा इतिहास गेल्या शतकभर शाळा-कॉलेजांतून व विद्यापीठांतून शिकविला जातो आहे.) या पुस्तकातून एक खेचून घेणारे आव्हान उभे केले आहे व लेखकद्वयाचे एवढेच सांगणे आहे की, त्यांनी तुमच्यासमोर मांडलेल्या पुराव्यातले सत्य वाचकांनी पडताळून पाहावे.
Description
HIDDEN HISTORY UNIQUELY EXPOSES THOSE RESPONSIBLE FOR THE FIRST WORLD WAR. IT REVEALS HOW ACCOUNTS OF THE WAR`S ORIGINS HAVE BEEN DELIBERATELY FALSIFIED TO CONCEAL THE GUILT OF THE SECRET CABAL OF VERY RICH AND POWERFUL MEN IN LONDON RESPONSIBLE FOR THE MOST HEINOUS CRIME PERPETRATED ON HUMANITY. FOR TEN YEARS, THEY PLOTTED THE DESTRUCTION OF GERMANY AS THE FIRST STAGE OF THEIR PLAN TO TAKE CONTROL OF THE WORLD. THE ASSASSINATION OF ARCHDUKE FRANZ FERDINAND WAS NO CHANCE HAPPENING. IT LIT FUSE THAT HAD BEEN CAREFULLY SET THROUGH A CHAIN OF COMMAND STRECHING FROM SARAJEVO THROUH BELGRADE AND ST. PETERSBURG TO THAT CABAL IN LONDON. HIDDEN HISTORY POSSESS TANTALISING CHALLANGE. THE AUTHORS ASK ONLY THAT YOU EXAMINE EVIDENCE THEY LAY BEFORE YOU.
Brand
GERRY DOCHERTY
जेरी डॉशेर्टीचा जन्म १९४८ साली झाला. त्याने १९७१ मध्ये एडिंबरो विश्वविद्यालयातून पदवी घेतली आणि माध्यमिक शिक्षकाचा पेशा स्वीकारला. अर्थशास्त्र व आधुनिक अभ्यास हे त्याचे अध्यापनाचे विषय. त्याला नाटकांविषयी खूपच आवड निर्माण झाली आणि त्याने ऐतिहासिक कथाबीजांवर कित्येक नाटके लिहिली. उदा. CZEMATE (झेमेट) १९८२, MONSTROSE (मॉनस्ट्रोस) १९९३ आणि LIE OF THE LAND (लाय ऑफ द लँड) २००८. यातील शेवटच्या नाटकाची जबरदस्त कथा त्याच्या टिलीकोल्ट्रीच्या मूळ गावच्या दोन चुलतभावांची आहे. दोघांनाही बॅटल ऑफ लूझसाठी १९१५मध्ये व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान केला गेला होता.
JIM MACGREGOR
जिम मॅकग्रेगरचा जन्म ग्लासगो इथे १९४७ साली झाला. अपंगांसाठी असलेल्या अर्सकिन हॉस्पिटलच्या आवारातील कॉटेजमध्ये तो लहानाचा मोठा झाला. युद्धामुळे नंतरच्या काळात घडत असलेला अनर्थ तो तिथे रोजच बघत होता. जे पाहिले त्यामुळे त्याचे मन फार खोलवर व्यथित झाले. त्या अनुभवातूनच युद्धे आणि जागतिक संघर्ष यांचे उगम वा मूळ कारणे शोधण्याची त्याला जी गोडी लागली, ती आयुष्यभरासाठीच. पंधराव्या वर्षी शाळा संपल्यावर त्याने भिन्नभिन्न प्रकारच्या नोकऱ्या केल्या. जसे की शेतमजुरी, पशुरेतन आणि औषधसंशोधन इत्यादी. त्यानंतर १९७८मध्ये त्याने डॉक्टर ही पदवी घेतली. ‘युद्धे टाळण्यात येणारे राजकीय अपयश’ याबाबत त्याला संशोधन करावयाचे होते. या संशोधनात स्वत:ला पूर्णवेळ झोकून देण्यासाठी त्याने २००१ साली वैद्यकीय व्यवसाय सोडला. त्याचे ‘कायद्याचे गर्भपात’, इराक युद्ध, जागतिक गरिबी आणि युनायटेड स्टेट्समध्ये फॅसिझमचा उदय अशा विविध विषयांवरचे असंख्य लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याने लिहिलेली ‘द इबोगा व्हिजन्स’ ही युद्धविरोधी जबरदस्त कादंबरी २००९ मध्ये प्रकाशित झाली व तिचे समीक्षकांकडून दणदणीत स्वागत/कौतुक झाले.
Reviews
There are no reviews yet.