COLLEGE – कॉलेज
₹280.00
Product Highlights
`या कॉलेजमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे. डिपार्टमेंट सुरू मी करायचं. एस्टॅब्लिश मी करायचं. मग हळूच कोणीतरी संधिसाधू मतलबी वाकडेबाई गरजू म्हणून, लाचार बनून येणार आणि शिरजोर होऊन टेकओव्हर करणार. विद्यार्थी आपण जमवायचे. तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. मग तथाकथित संस्थाचालक आणि प्राचार्य आपल्यापुढं गोंडा घोळणाऱ्या माणसांची अध्यापक म्हणून वर्णी लावणार. रिझल्ट उत्तम लागावेत म्हणून आपण मरमर करणार. रजा न घेता एक्स्ट्रॉ क्लासेस घेणार. नोट्स देणार. त्यातून तुकडी तयार होणार. त्या तुकडीला हे नवे लोक शिकवणार. उत्तम शिक्षक म्हणून आपलाच उदो उदो करायला विद्याथ्र्यांना चलाखीनं प्रेरित करणार. इतकं सगळं किळसवाणं आहे, ओंगळ आहे… या सगळ्याची चीड येत नाही तुम्हाला, सर?` ‘तुम्ही अजूनही पक्क्या मुरलेल्या प्राध्यापिका झाला नाहीत. अजून अनुभव येतील. मग इतकी चीड येणार नाही. फक्त असहाय्यता जाणवेल. तीही आपण काही करू शकत नाही याची! सगळेजण एकच गोष्ट सांगतील. सगळ्या कॉलेजमध्ये असंच चालतं. पुढं पुढं आपलीही खात्री पटते की, सगळीकडे हेच चालत असेल तर भल्याभल्यांनी हात टेकले असणार. त्यामुळे तुम्हाला एक पोक्त सल्ला देतो- तुमचं करियर पाहा.’ सध्याच्या महाविद्यालयाीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख काढणारी आणि अंतर्मुख करणारी सामथ्र्यशाली कादंबरी.
Description
THIS NOVEL IS A CRITICAL COMMENT ON PREVAILING EDUCATION SYSTEM AND IS REPRESENTATIVE OF THE STATE OF AFFAIRS IN THE FIELD OF EDUCATION ALL OVER THE COUNTRY. IT IS IN A WAY AN ASSESSMENT OF THE SYSTEM PUTTING A QUESTION MARK ON THE ALL ROUND DEVELOPMENT OF THE STUDENT AND OUR FUTURE GENERATION – THE BACKBONE OF THE NATION. IT IS IRONICAL THAT WHEREAS THE STUDENT SHOULD BE IN THE FOCUS AND THE CENTRE HE IS MARGINALIZED TOTALLY AND SO IS SEEN IN THIS NOVEL.
Brand
CHHAYA MAHAJAN
Birth Date : 12/04/1949
डॉ. छाया महाजन या एम.ए.(इंग्रजी), असून त्यांनी इंग्रजी विषयातच डॉक्टरेट (पीएच.डी.) मिळवली आहे. इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका व प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले आहे. औरंगाबादमधील डॉ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात त्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. पीएच.डी व एम.फिलच्या मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आजवर त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. यामध्ये स्पर्श , वळणावर , नकळत , मोरबांगडी , एकादश कथा , ओढ हे लघुकथासंग्रह तसेच निळ्या डोळ्यांचा माणूस , हरझॉग हे अनुवादित कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कॉलेज , मानसी , तन अंधारे या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. फुलांच्या गोष्टी , मुलांचे प्रेमचंद (३ खंड) या बालसाहित्याचे लिखाणही त्यांनी केले. मोगरा फुलला , भोवरा , रक्ताचा रंग एक या प्रकारच्या प्रौढशिक्षणावर आधारित साहित्य लिहिले. वुइमेन इन पॉल स्कॉटज नॉव्हेल्स यावर इंग्रजीतून संशोधनपर लिखाणही प्रसिद्ध झाले आहे. विविध वृत्तपत्रांतून इंग्रजी साहित्य, स्त्रीवादी साहित्य व विविध विषयांवर लेख व मुलाखाती प्रसिद्ध झाल्या आहेत. विविध साहित्यविषयक, सामाजिक व स्त्रीविषयक परिषदांमध्ये तसेच विविध साहित्य संमेलने व सामाजिक संमेलनांच्या परिसंवादातही त्यांनी सहभाग घेतला आहे. नकळत या लघुकथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९२), कॉलेज या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा वि.स. खांडेकर पुरस्कार (२००७) तसेच स्वातंत्र्यसौनिक श्री. विनायकराव चारठाणकर पुरस्कार मिळाला आहे. महाजन यांना मराठवाडा गौरव पुरस्कार (सामाजिक व शैक्षणिक कार्याप्रीत्यर्थ), मराठवाडा भूषण पुरस्कार (साहित्य क्षेत्रातल्या कार्याप्रीत्यर्थ) ही प्राप्त झाले आहेत.
Reviews
There are no reviews yet.