CHOUNDAKA – चौंडकं
₹180.00
Product Highlights
आपल्या समाजातील देव, धर्म, अनिष्ट रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी. `जोगतीण देवाची, मालकी गावाची` ही आपल्या बोलीतील म्हण तिच्या जगण्याचं सार सांगते. देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ `चौंडकं` ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. स्त्रीदु:खाचा नेमका वेध, बोलीची सर्व सामर्थ्य पचवून राजन गवस यांनी `चौंडकं`मध्ये घेतला आहे. `सुली`च्या व्यक्तिरेखेतून एक ठसठशीत वेदना आपल्यासमोर येते. देवदासीच्या जगण्यातील सर्व दु:ख आणि तिच्या समस्यांचा वेध घेणारी कादंबरी म्हणून `चौंडकं`ची नोंद विशेषत्वानं करावी लागेल.
Description
THIS NOVEL REPRESENTS THE SADDENING STORY OF THE `DEVDASI` TRIBE. WHAT IS A DEVDASI? IT IS A TRADITION CREATED BY PEOPLE WITH EVIL INTENTIONS FOR THEIR OWN BENEFITS. SHE IS A VICTIM TO MISCONCEPTIONS, WRONG TRADITIONS, SO CALLED RELIGION, ALL CREATED IN THE NAME OF THE GOD. A DEVDASI IS OFFERED TO THE GOD AND THUS BECOMES A PUBLIC PROPERTY. ANY MALE MEMBER CAN CLAIM HER. SHE FALLS PREY TO THE HARASSMENT OF THE PEOPLE. THIS NOVEL PRESENTS A TRUE PICTURE OF HER TORTURE IN THE NAME OF TRADITIONS. THE AUTHOR HAS PRESENTED THE ANGUISH THROUGH `SULI`, THE MAIN CHARACTER. HE NEATLY AND IMMACULATELY PRESENTS THE VARIOUS ASPECTS OF A FEMALE MIND, THE LANGUAGE, THE FEELINGS, ETC. `CHAUNDAK` SHOULD BE RECOGNIZED AS A NOVEL PENETRATING THE REAL FACTS OF THE LIFE OF A `DEVDASI`.
Brand
RAJAN GAVAS
Birth Date : 01/06/1959
राजन गवस यांचा जन्म १९५९ साली झाला. कोल्हापूर विद्यापीठातून त्यांनी एम.ए., एम.एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करून ते प्रभावीरित्या लोकांसमोर मांडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मानले जाते. रिवणावायली मुंगी, चौंडकं आणि भंडारभोग या त्यांच्या साहित्यकृती लोकप्रिय आहेत. या त्यांच्या साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत. मराठीचे आशययुक्त अध्यापन यासारखे संशोधनात्मक लेखनही त्यांनी केले आहे. भंडारभोग या कादंबरीला संस्कृती प्रतिष्ठान, वि.स. खांडेकर आणि ग.ल. ठोकळ हे पुरस्कार मिळाले आहेत. या शिवाय ह.ना. आपटे, भैरूरतन दमाणी असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार राजन गवस यांना मिळाले आहेत.

Reviews
There are no reviews yet.