CHHAVANI – छावणी
₹200.00
Product Highlights
२६ जानेवारी, २००१. भुज. आई-वडिलांचं छत्र नसलेला एक तरुण थोरल्या भावाच्या आणि वहिनीच्या वागण्याने उद्ध्वस्त झालेलं मन सावरायला मित्राकडे जातो, आणि तो बसमधून उतरत असतानाच प्रचंड मोठा भूकंप होतो –दीड मिनिट – हजारो निरपराध जिवांचे मरण… अनेक स्वप्नं उराशी बाळगून कष्टानं उभी केलेली घरकुलं क्षणार्धात जमीनदोस्त… कुणाचे पोटचे गोळे जमिनीत गाडले गेले; कुणाचे जीवनसाथी, कुणाची तरणीताठी मुलं, तर कोणाचं छत्र! भक्कम वाटलेला आसरा जातो, आपली वाटणारी माणसंही जातात, तेव्हा माणसं कशी वागतात; त्यातून सावरताना, गुण-दोषांसकट त्यांचे मूळ स्वभाव कसे वर येतात; त्यातून मनुष्यस्वभावाचे वेगवेगळे पैलू कसे दिसू लागतात; यांचे प्रत्ययकारी चित्रण म्हणजे ही कादंबरी. कुणीच ‘आपलं’ न राहिलेल्या, सर्वस्व गमावून बसलेल्या माणसांची ही कथा मानवी स्वभाव व मानवी अस्तित्व यांबद्दल भाष्य करते, नवी दृष्टी देते.
Brand
DHIRENDRA MEHTA
Birth Date : 29/08/1944
गुजराथी साहित्य या विषयात एम.ए. आणि पीएच.डी. झालेल्या मेहता यांनी अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज आणि भुज येथील आर.आर. लालन कॉलेज येथे एकूण ३७ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी कच्छ युनिव्हर्सिटीत एम.फिलच्या विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. १९८० सालापासून मेहता सातत्याने लेखन करीत आहेत. ते कवी, कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून वाचकांना परिचित आहेत. याशिवाय त्यांनी विवेचक व संपादक अशा जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. त्यांची ३० पुस्तके प्रकाशित असून त्यातील काही पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी व ओडिया भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. काही कथांचे मराठीत अनुवाद झाले आहेत. २०१० साली त्यांच्या छावणी या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांना रणजितराम सुवर्णचंद्रक , साहित्य क्षेत्रातील कामाबद्दल मुनशी सुवर्णचंद्रक , कादंबरी लेखनासाठी दर्शक फाउंडेशन अॅवॉर्ड व धूमकेतू चंद्रक आणि गुजराती साहित्य परिषद पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Reviews
There are no reviews yet.