CHAVADI – चावडी
₹130.00
Product Highlights
‘चावडी’ आणि ‘जागल्या’ हे वेळोवेळी केलेले स्तंभलेखन असून ते सरळ दोन कप्पे आहेत. तोंडवळा भिन्न असला, तरी सामाजिक बांधिलकीचे सूत्र दोन्ही भागांत कायम दिसेल. जागल्या’चा तोंडवळा हा तसा गावरानी ढंगातला. लेखकाच्या लहानपणापासून हा जागल्या त्यांच्या मनात दडून बसलेला आहे. मनात येईल ते सरळ बोलावे, कुणाच्याही दबावाखाली वावरू नये, अशी माणसे त्यांनी खेड्यात पाहिलेली. पुढे माणूस जसा मध्यम वर्गात येत जातो, तसे त्याच्या सर्वच वृत्ती कासवाच्या अवयवासारख्या आकुंचित होतात. जागल्याचा विनोद (विनोद शब्द अपुरा वाटतो) उपहास म्हणायला हवा. हा अनेकांना बोचरा वाटतो. आपले समाजमन किती बंदिस्त आहे, याचीही प्रचीती येत जाते.
Description
CHAWADI AND AWAZ ARE THE PERIODICALS WRITTEN IN THIS PERIOD AND THEY HAVE TWO SEPARATE COMPARTMENTS. EVEN THOUGH THE LATTER IS DIFFERENT, THE SOCIAL COMMITMENT FORM WILL ALWAYS BE SEEN IN BOTH THE PARTS. PEOPLE IN THE VILLAGE SHOULD SEE THAT THEY SHOULD TALK STRAIGHT AND THEY SHOULD NOT GO UNDER ANY PRESSURE. AFTER ALL, AS A MAN GETS IN THE MIDDLE CLASS, ALL HIS INTENTIONS ARE NARROWED LIKE A TURTLE. AWAKE JOKE (THE WORDS OF HUMOR SEEM INSIGNIFICANT) TO BE RIDICULOUS. MANY OF THESE FEEL UPSET IT IS ALSO A REMINDER THAT HOW MUCH SOCIETY IS IN YOUR SOCIETY.
Brand
DAYA PAWAR
Birth Date : 15/09/1935
Death Date : 20/12/1996
दया पवार म्हणजेच दगडू मारुती पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे झाला. १९५६मध्ये मुंबईतील पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी लेखनिक व प्रयोगशाळा सहायक म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९६७मध्ये अस्मितादर्श मध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. दलित साहित्य चळवळीच्या कार्यात १९६८पासून त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९६९मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान मुखपत्रात त्यांचा दलित साहित्यावर लिहिलेला लेख पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. श्रीलंकेत कोलंबोमध्ये १९७५ला भरलेल्या जागतिक बुद्ध परिषदेलाही ते हजर होते. दया पवार यांनी विपुल लिखाण केले. त्यांपैकी बलुतं हे १९७८मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. दलित जीवनाची एक वेगळी ओळख त्यांनी यातून करून दिली. १९७९मध्ये राज्य शासनाचा पुरस्कारही त्याला मिळाला. १९८१मध्ये बलुतंची हिंदी आवृत्ती प्रकाशित झाली. त्या आधी कोंडवाडा (१९७४) या त्यांच्या काव्यसंग्रहालाही १९७५मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. १९८२मध्ये फोर्ड फाउंडेशन ची शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झाली. त्यासाठी ते अमेरिकेला गेले होते. १९८४ला जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे भरलेल्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये दलित साहित्यावर त्यांनी एक शोधनिबंध सादर केला होता. १९८८ ते १९९४ या कालावधीत ते बालभारती पाठ्यपुस्तक समितीचे सदस्य होते. १९८७ ते १९९४ या दरम्यान महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. १९९०मध्ये दया पवार यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १९९३मध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते. याशिवाय विटाळ कथासंग्रह (१९८३), बलुतं एक वादळ (१९८३), चावडी स्फुटलेख (१९८३), पासंग(१९९३) व जागल्या स्तंभलेखन, पाणी कुठंवर आलं गं बाई काव्यसंग्रह, कल्लपा यशवंत ढाले यांची डायरी (१९८४), धम्मपद पाली भाषेतील धम्मपदांचा मराठी अनुवाद (१९९१) असे आजवर त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झाले. फिल्म डिव्हिजनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील लघुपटाचे कथालेखन (१९९३) त्यांनी केले. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपटाच्या पटकथा लेखनातही त्यांचा सहभाग होता. १९९४-९५मध्ये ते परिवर्तन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते.2
Reviews
There are no reviews yet.