CHAR SHABDA DYAVE-GHYAVE – चार शब्द द्यावे-घ्यावे
₹70.00
Product Highlights
आपल्या अंगातली हुशारी दाखवायची असेल, तर संभाषण हे करावंच लागतं. ज्याला संभाषणातून सुसंवाद साधता येतो, तोच खरा कर्तबगार ठरतो. वरिष्ठ त्याच्याच बाजूनं कौल देतात. सहकारी त्याच्याच बाजूनं उभे राहातात. आप्तेष्ट त्याचंच ऐकतात. ग्राहक अशाच व्यापायाची भरभराट करतात. ह्याचा अर्थ सगळ्यांची हांजी हांजी करायची असा नाही, तर चार शब्द देताना आणि घेताना थोडीशी काळजी घ्यायची. ती आपल्याला कशाप्रकारे घेता येईल, ह्याबद्दल काही अनुभव लिहिले आहेत. ते तुम्ही वाचलेत तर तुम्हालाही ते नक्कीच उपयोगी पडतील.
Description
UNLESS YOU COMMUNICATE NONE OF YOUR TALENTS WILL BE NOTICED BY OTHERS. THE ONE WHO CAN CONNECT THROUGH APPROPRIATE CONVERSATION IS ELIGIBLE FOR SUCCESS. ELDERS STAND FOR HIM. COLLEAGUES COOPERATE WITH HIM. RELATIVES LISTEN TO HIM. CUSTOMERS POUR BLESSINGS OF PROSPERITY ON HIM. FINALLY, EVEN THE DESTINY FAVOURS HIM. THIS DOES NOT MEAN YOU BECOME “YES MAN` AND TRY TO PLEASE EVERYONE. THIS ONLY MEANS THAT WHILE COMMUNICATING, ONE NEEDS TO TAKE CARE OF SOME PRINCIPLES. COMMUNICATION IS A TWO WAY PROCESS. YOU SEND INFORMATION RECEIVE INFORMATION AS WELL. SOMETIMES YOU ARE REQUIRED TO GIVE FEEDBACK AND ENSURE IT LANDS WITH OTHER PERSON IN THE MANNER IN WHICH IT IS SUPPOSED TO LAND. AT TIMES YOU ARE ALSO REQUIRED TO RECEIVE FEEDBACK AND WHILE DOING SO YOU ARE REQUIRED TO ENSURE THAT IT LANDS WITHOUT ANY PREJUDICE, JUDGEMENTS OR ANY EVALUATIVE STATEMENTS. APPARENTLY, THIS APPEARS VERY VERY DIFFICULT. HOWEVER IF YOU READ THIS BOOK YOU MAY REALIZE THAT IT IS NOT VERY VERY DIFFICULT. YOU WILL ENJOY READING SOME EXPERIENCES IN THE PROCESS OF GIVING AND RECEIVING FEEDBACK.
Brand
SANJEEV PARALIKAR
Birth Date : 30/11/1901
वर्तन शैली, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास ह्यांसारख्या विषयांवर अनेक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत. आठ हजारांहून अधिक लोकांनी त्यांच्या कार्यशाळेचा फायदा घेतलेला आहे. आज संजीव परळीकर हे इनोव्ह सोर्स सोल्युशन ह्या कंपनीमध्ये एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आहेत. तत्पूर्वी नऊ वर्षे ते जीटीएल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये ट्रेनिंग विभागात, ला\नग अॅन्ड डेव्हलपमेंटचे जनरल मॅनेजर ह्या हुद्यावर कार्यरत होते. त्याआधी ते युनायटेड कार्बन ह्या कंपनीत पर्सनल मॅनेजर ह्या हुद्यावर वर्षभर काम करत होते. त्याआधी दोन वर्षे ते निकोलस पिरामल ह्या कंपनीत एम्प्लॉई रिलेशन्स मॅनेजर या हुद्यावर होते. परंतु त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात हेक्स्ट इंडिया लिमिटेड ह्या औषध निर्मितीच्या कंपनीमध्ये जनरल वर्कर ह्या पदापासून केली. कंपनीत कामगार म्हणून काम करत असतानाच त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं, कॉमर्सची पदवी मिळवली आणि सात वर्षांमध्ये कामगार ह्या पदावरून ऑफिसर ह्या पदापर्यंत बढती मिळवली. त्यानंतर पर्सनल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले व पुढच्या दहा वर्षांत असिस्टंट मॅनेजर ह्या पदापर्यंत त्यांची प्रगती झाली. परंतु त्यापुढे बढती मिळणे अशक्य झाल्यामुळे सतरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांनी निकोलस पिरामल ह्या कंपनीकडे आपला मोर्चा वळवला. लेखकाकडे गेल्या तीस वर्षांतील व्यावसायिक आयुष्यातले अनेक अनुभव आहेत, तेच त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.
Reviews
There are no reviews yet.