CEO CHA CABIN MADHUN – सी. ई. ओ. च्या केबिनमधून…
₹195.00
Product Highlights
जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडी, चलनवाढ तसेच देशांतर्गत राजकारण यामुळे अर्थव्यवस्था, उद्योग, तंत्रज्ञान, समाजावस्था यांत व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणसाच्या खासगी जीवनावर होणारे त्याचे परिणाम यांचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या माहितीपूर्ण लेखांनी त्यांनी आपल्या वाचक वर्गाला अद्ययावत केले आहे. विकासामुळे आपले जीवन समृद्ध झाले. आधुनिक तंत्रज्ञान हा प्रगतीचा पाया ठरावा. संगणकामुळे सुखकर झालेल्या जीवनशैलीमुळे भारतीय तरुणांमध्येदेखील नवीन मनोवृत्तीचा विकास होत आहे. आधुनिकता आत्मसात करत आजची पिढी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांच्या वापरातून नवीन पिढीच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने आपल्या व्यवसायाच्या कक्षा विस्तृत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. डॉ. वालावलकर यांनी बदललेल्या या परिस्थितीवर दृष्टी टाकली आहे. आपल्या अनेक लेखांत त्यांनी निरनिराळ्या महत्त्वाच्या विषयांवर आपली भूमिका विशद केली आहे. ‘स्विस बँकांची वादग्रस्त व्यावसायिकता’ या आपल्या लेखात आर्थिक सत्ता, तिची राजकारणाशी होणारी सांगड आणि त्यानंतर निर्माण झालेले सार्वभौमत्व म्हणजेच जणू स्विस बँक, हे दाखवून दिले आहे. या आपल्या लेखातील अवैध मार्गाने मिळालेला पैसा, त्यांचा व्यवहार यात भारतीयांची गुंतवणूक व मोदी सरकारने वठविलेली भूमिका या गोष्टी वाचनीय आहेत. ‘नवीन संसाधने’मध्ये त्यांनी आधुनिकीकरणामुळे (MODERNISATION) प्राप्त झालेल्या निरनिराळ्या सोयी-सुविधांविषयी विस्तृत लिहिलेले आहे. ओला, उबर कॅब्स इत्यादामुळे वेळी-अवेळी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना ही सुविधा कशी अधिक सुखमय वाटते, याची माहिती दिली आहे. परदेशातील कथा-कादंबऱ्यादेखील आता भारतात सहज उपलब्ध आहेत. सुप्रसिद्ध ‘मिल्स आणि बून’च्या कादंबऱ्याचा प्रादेशिक भाषा स्वीकारून भारतात झालेला गृहप्रवेश डॉ. वालावलकर यांनी अप्रतिमरीत्या मांडला आहे. सध्या माणसांचे शेड्यूल इतके बिझी झाले आहे की, कुटुंब वा निरनिराळे ग्रुप्स एकत्र बाहेर जाणे, सहज भेटणे हे आता दुर्मीळ झाले आहे. त्यामुळे करमणुकीचे मार्गदेखील इंटरनेटपुरते मर्यादित राहिले आहेत. मनोरंजनासाठी वेबटेलिव्हिजनच्या सीरीजमध्ये लोक कसे गुंतलेत त्याचे उत्तम दर्शन आपल्याला ‘वेबसीरीज करमणूक ऑनलाईन’मध्ये वालावलकरांनी घडविले आहे. या सर्व सोयी-सुविधांसाठी पैसा महत्त्वाचा आहे. संपत्तीचा, मालमत्तेचा साठा करायला सुरुवात झाली आहे. LAVISH LIFESTYLE साठी अमाप कष्ट करण्याची तयारी तरुण वर्ग दाखवत आहे, हे एका दृष्टीने योग्य आहे. पण त्याचबरोबर विलासी वृत्तीमुळे हाच पैसा पाण्यासारखा खर्च करण्याकडेही त्यांचा कल वाढतोय. श्रीमंती आणि संतोष याची सांगड घातल्यावरच सुख चालून येते. आपल्या ‘उद्योगी श्रीमंती’मध्ये डॉ. वालावलकर यांनी ही सद्य परिस्थिती अभिव्यक्त केली आहे. माणसाच्या अपेक्षा वाढल्या की त्यातून मागण्या वाढत जातात. त्यात नैसर्गिक आपत्ती, राजकारणातील अस्थिरता, आकस्मिक उद्भवणाऱ्या आपत्ती यामुळे वाढणारी महागाई याच्या झळादेखील सर्वसामान्य नागरिकांना शेवूÂन काढतात. सुस्थितीतील लोकांचा कणादेखील महागाईने वाकला जातो. डॉ. वालावलकर यांनी कराडमध्ये अर्धपोटी राहणाऱ्या कामगारांवर प्राप्त परिस्थितीमुळे झालेल्या अत्याचाराचे दर्शन घडले, त्याविषयीही लिहिले आहे. जैवतंत्रज्ञानामधल्या या संशोधकाने नावाजलेल्या कंपन्यांत जबाबदारीची पदे भूषविताना, आपल्या अनुभवाच्या चष्म्यातून अभ्यासलेले जीवनातील विविध टप्प्यांतील निरीक्षण आपल्या लेखांमध्ये शब्दबद्ध केले आहे. आर्थिक, राजकीय विषयांवरील त्यांच्या लेखनातून त्यांनी वास्तविकतेचे आकलन केले. ही माहिती भरपूर प्रमाणात देशांतर्गत आणि परदेश प्रवास आणि विविध क्षेत्रांतल्या अनेक स्तरांवरच्या लोकांच्या भेटीगाठी आणि चर्चा, यामधून त्यांना मिळालेली आहे. हे लेख ज्यांच्याभोवती लिहिले गेले आहेत, ते विषय आणि घटना वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित आहेत. परंतु समोर येत असलेल्या एका सर्वव्यापी स्थित्यंतराचे ते निदर्शक आहेत. या स्थित्यंतरामुळे उद्याच्या औद्योगिक, राजकीय, आणि आपल्या वैयक्तिक जीवनातल्या यशाच्या संकल्पना आणि नियम आमूलाग्र बदलणार आहेत. त्यातूनच उद्याच्या औद्योगिक, राजकीय आणि सामजिक अवकाशाची संरचना आणि आपल्या जगण्याच्या समृद्धतेचं सूत्र सापडणार असल्याचे लेखक सांगतो.
Description
DR. GIRISH WALAVALKAR`S BOOK `C.E.O CHYA KEBIN MADHOON…` ELUCIDATES THE IMPACT OF ECONOMIC DEVELOPMENTS ON CHANGING LIFESTYLES, PRIORITIES, AND WAY OF THINKING OF A COMMON MAN. CONTINUOUS EXPANSION AND DEVELOPMENT OF VARIOUS ORBITS IS THE CONSTANT FEATURE OF THE UNIVERSE. THIS HOLDS TRUE FOR INDUSTRY, TECHNOLOGY, ECONOMICS, POLITICS, SOCIAL STRUCTURE AS WELL AS FOR OUR INDIVIDUAL PERSONAL LIFE. IN LAST FEW YEARS , THE WORLD ESPECIALLY INDIA IS CHANGING ECONOMICALLY, POLITICALLY AND SOCIALLY WITH A SPEED AND ACCERELATION WHICH WAS NEVER IMAGINED BEFORE. THESE CHANGES ARE INFLUENCING COMMON MAN`S LIFE DIRECTLY. HIS LIFE STYLE, PRIORITIES AND CONCEPTS ARE CHANGING DRASTICALLY. `C. E. O. CHYA KEBIN MADHOON…` PROVIDES A GUIDELINE TO ADAPT TO THESE CHANGES AND IN TURN IMPROVE THE QUALITY OF LIFE. AT THE SAME TIME, IT ALSO EXPLAINS THE NEED OF KEEPING OUR ROOTS INTACT TO ACHIEVE LASTING MENTAL PEACE IN THE THE WORLD WHICH IS BECOMING MORE AND MORE COMMERCIAL AND PRAGMATIC DAY BY DAY.
Brand
GIRISH WALAWALKAR
डॉ. गिरीश वालावलकर यांनी मुंबई विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली. एंझाईम टेक्नॉलॉजी या विषयात त्यांनी संशोधन केलं आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी आय.आय.एम.- अहमदाबाद येथे सर्टिफिकेट कोर्स केला आहे. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, दैनिक भास्कर, लोकमत, कृषीवल या समूहांच्या इंग्रजी, मराठी वृत्तपत्रं आणि नियतकालिकांमध्ये त्यांनी विविध विषयांवर लेखन केलं आहे. त्यांचं अपरिचित हे नाटक दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आलं होतं. फरमेंटा बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या जीवतंत्रज्ञान विभागाचे सी.ई.ओ. म्हणून ते आठ वर्षं कार्यरत होते. जर्मनी, स्वित्झर्लंड, इंग्लंड, स्पेन, श्रीलंका, बांगलादेश, चीन इत्यादी देशांमध्ये व्यवसायासंबंधीची प्रेझेंटेशन्स त्यांनी केली आहेत. सध्या ते वोखार्ड फाउंडेशन चे डायरेक्टर आहेत.
Reviews
There are no reviews yet.