BOCHAKA – बोचकं
₹160.00
Product Highlights
`बोचकं` ही आत्मकथनात्मक कादंबरी समाजातल्या अनेक पदरांचं दर्शन घडवते. नारायणचं लग्न (१९६८) ते आईचा मृत्यू (२००२) या कालावधीतील ही कथा निव्वळ नारायणची नाही. गिरगावातील फूटपाथवर भाजी विकत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणा-या व मुलांना वाढवणा-या नारायणची आई सावित्राबाई; नारायणची पत्नी उर्मिला, नारायणचे अन्य नातेवाईक, नारायणला त्याच्या समाजोपयोगी कार्यात खांद्याला खांदा लावून मदत करणारे कार्यकर्ते; नारायणला अनेक बरेवाईट अनुभव मिळवून देणारे अन्य अशा सर्वांची ही गोष्ट आहे. ‘माझं दु:ख हे जगाचं दु:ख आहे व जगाचं दु:ख हे त्याहूनही मोठं आहे’ हे प्रांजळपणे मांडलेले विचार वाचकाला अंतर्मुख करतात. `गटुळं` ही रवींद्र बागडे यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी नारायणच्या जन्मापासून लग्नापर्यंतच्या जीवनप्रवासाचं वर्णन करते.
Brand
RAVINDRA BAGDE
बागडे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील लोणंदजवळील आरडगाव येथे चर्मकार समाजात झाला. मुंबईत त्यांचे इंटरपर्यंत शिक्षण झाले. परंतु घरातल्या प्रचंड दारिद्र्यामुळे त्यांना बूटपॉलिश व रस्त्यावर भाजी-विक्रीचा धंदा करून गुजराण करावी लागली. संवेदनशील मन लाभलेल्या बागडे यांनी सजगपणे जगण्याचे चिंतन व मनन केले. यातूनच त्यांनी गटुळं आणि बोचकं या दोन आत्मकथनात्मक कादंबऱ्या लिहिल्या. या कादंबऱ्या भारतीय समाजव्यवस्थेतल्या दीनदलित समाजाचे प्रश्न थेट मांडतात. त्यांचे जीवन चितारतात; अंतर्मुख करतात. मराठीत दीनदलितांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये या कादंबऱ्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. लहानपणापासून लेखनाची व समाजकार्याची आवड असलेल्या बागडे यांनी मुंबईत झोपडपट्टीवासीयांकरिता, विशेषत: धारावी, अंधेरी, बोरिवली येथे नागरी सुधारणेचे व समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यांची इतरही पुस्तके प्रकाशित असून वृत्तपत्रांमधूनही त्यांनी लेखन केले आहे.
Reviews
There are no reviews yet.